• Download App
    Coronavirus update : देशात २४ तासांत कोरोनामुळे २१४ जणांचा मृत्यू, १८,१६६ नवे रुग्ण; रुग्णसंख्या घटल्याने दिलासा । 214 deaths, 18,166 new cases due to corona in 24 hours in the country; Relief from declining patient numbers

    Coronavirus update : देशात २४ तासांत कोरोनामुळे २१४ जणांचा मृत्यू, १८,१६६ नवे रुग्ण; रुग्णसंख्या घटल्याने दिलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात ओसरत चालली आहे. कारण गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहेत. देशात १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले तर २१४ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रुग्णांची संख्या गेल्या २०८ दिवसांतील सर्वात कमी आहे. रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर आहे. 214 deaths, 18,166 new cases due to corona in 24 hours in the country; Relief from declining patient numbers

    कोरोनामुळे ४ लाख ५० हजार ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांची रोजची आकडेवारी गेल्या १६ दिवसांपासून ३० हजारांपेक्षा कमी आहे. देशात ३ कोटी ३९ लाख ५३ हजार ४७५ रुग्ण आहेत. त्यातील ९७.९९ टक्के जण बरे झाले.

    गेल्या मार्चपासूनचे रुग्णांचे हे सर्वाधिक कमी प्रमाण आहे. चोवीस तासांत उपचाराधीन रुग्णांमध्ये ५,६७२ ने घट झाली. कोरोनाचा रोजचा संसर्गदर १.४२ टक्के असून गेल्या ४१ दिवसांपासून हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा दर आठवड्याचा संसर्गदर १.५७ टक्के असून, तो गेल्या १०७ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.



    कोरोनातून ३ कोटी ३२ लाख ७१ हजार ९१५ जण बरे झाले.  देशात ५८ कोटी २५ लाख ९५ हजार ६९३ चाचण्या केल्या. जगभरात कोरोनाचे २३ कोटी ८४ लाख रुग्ण असून त्यातील २१ कोटी ५६ लाख जण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये ४ कोटी ५१ लाख बाधित आहेत व ७ लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला.

    214 deaths, 18,166 new cases due to corona in 24 hours in the country; Relief from declining patient numbers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!