वृत्तसंस्था
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एका साक्षीदाराच्या साक्ष फिरण्याने वेगळे वळण लागले आहे. 2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court that he was tortured by ATS, the then probe agency of the case
उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार लोकांचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध आहे, असे माझ्याकडून महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दबाव आणून वदवून घेतले, असे एका साक्षीदाराने कोर्टात आज सांगितले.
यावरून मालेगावात मोठे राजकारण सुरू झाले असून मालेगावचे एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल खालिक यांनी साक्षीदाराच्या वक्तव्याचा संबंध उत्तर प्रदेश निवडणुकीशी जोडला आहे.
साक्षीदाराने दिलेल्या वक्तव्या संदर्भात बोलताना मुफ्ती म्हणाले, की 2008 मध्ये घडलेल्या प्रकरणात 13 – 14 वर्षांनंतर एखाद्या साक्षीदाराने साक्षी फिरवणे आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असे सांगणे हा सगळा राजकीय बनाव आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा बनाव रचण्यात आला आहे. निवडणुका नसत्या तर या पद्धतीची साक्ष फिरवण्याचे प्रकार घडले नसते, असा दावा देखील आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलीक यांनी केला आहे.
2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court that he was tortured by ATS, the then probe agency of the case
महत्त्वाच्या बातम्या
- मधुबन में राधिका नाचे गाण्यावर बोल्ड स्टेप्स, सनी लियोनीच्या अटकेची मागणी, सलमानवरही कारवाईचा आग्रह
- नितीन गडकरी म्हणाले, फुकट दिले तर लोकांना हरामाचा माल वाटतो
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी
- लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार