• Download App
    राजौरीत हिंदूंचे हत्याकांड घडवणाऱ्या ISI च्या 2 दहशतवाद्यांचा पाकिस्तानातच खात्मा! 2 terrorists of ISI who committed massacre of Hindus in Rajouri were killed in Pakistan

    राजौरीत हिंदूंचे हत्याकांड घडवणाऱ्या ISI च्या 2 दहशतवाद्यांचा पाकिस्तानातच खात्मा!

    वृत्तसंस्था

    जम्मू : जम्मू – काश्मीरमधील डांगरी हत्याकांडाची ‘आग’ अजून विझली नसताना त्याआधीच पाकिस्तानातच हिंदूंचे हत्याकांड घडवून आणणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. हे दोन दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय)चे हेर म्हणून काम करत होते. 2 terrorists of ISI who committed massacre of Hindus in Rajouri were killed in Pakistan

    इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (ISI) म्होरके नावेद सादिक आणि नासिर अब्बास हे मूळचे मुलतानचे होते. ते खानवाल जिल्ह्यातील पिरोवाल भागातील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथे चहा पिऊन दोघेही पार्किंगमध्ये गेले, तेथे त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आणि दोघांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर मोटारसायकल वरून पळून गेले. या गोळीबारात आयएसआयचा संचालक नावेद सादिक आणि इन्स्पेक्टर नासिर बट यांचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    भारताविरुद्ध कट

    गोळीबारात ठार झालेला आयएसआयचा गुप्तहेर नावेद सादिक हा भारताविरुद्धच्या कटात सहभागी होता. भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमुळे, नवीद सादिक याला 2021 मध्ये पाकिस्तान सरकारने सितारा-ए-शुजात या पुरस्काराने सन्मानित केले होते. काश्‍मीरमधील हिंदूंवरील हल्‍ल्‍यांमध्‍ये नावीद सादिकची भूमिका प्रमुख आहे. त्यानेच डांगरी हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. यात दहशतवाद्यांनी 6 निरपराध हिंदूंना मारले होते.

    ISI ला मोठा झटका

    नावेद सादिक हा आयएसआयचा मोठा मोहरा होता. तो भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे गुंतला होता. सध्या त्याचे लक्ष्य काश्मीर खोऱ्यातील हिंदू होते. सादिकच्या हत्येमागे अल कायदाचा हात असण्याची शक्यता पाकिस्तानचे पोलीस आणि आयएसआय वर्तवत आहे.

    2 terrorists of ISI who committed massacre of Hindus in Rajouri were killed in Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही