• Download App
    उत्तर प्रदेशात आणखी दोन माफियांची १६५ हेक्टर जमीन जप्त; शमशाद आणि शरीफ पहिलवान यांच्यावर कायद्याचा बडगा । 165 hectares of land seized from two more mafias in Uttar Pradesh; Lawsuit against Shamshad and Sharif Pahilwan

    उत्तर प्रदेशात आणखी दोन माफियांची १६५ हेक्टर जमीन जप्त; शमशाद आणि शरीफ पहिलवान यांच्यावर कायद्याचा बडगा

    वृत्तसंस्था

    संभल : उत्तर प्रदेशात योगी सरकारचा माफियांविरोधातील कायद्याचा बडगा चालणे थांबायला तयार नाही. आज संभल जिल्ह्यातले माफिया शमशाद आणि शरीफ पहिलवान यांनी बेकादेशीररित्या खरेदी केलेली १६५ हेक्टर जमीन सरकारने जप्त केली. 165 hectares of land seized from two more mafias in Uttar Pradesh; Lawsuit against Shamshad and Sharif Pahilwan

    शमशाद आणि शरीफ पहिलवान हे उत्तर प्रदेश गँगस्टर ऍक्टखाली जेलमध्ये बंद आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत संभलमध्ये बेकायदेशीरित्या जमीन खरेदी केली होती. काही हेक्टर जमीन बळकावली होती. तिचा हिशेब केल्यावर ती जमीन एकूण १६५ हेक्टर एवढी भरली. तिची सध्याची किंमत १.२५ कोटी रूपये आहे.

    या जमिनीवर काही बांधकाम करण्याचा शमशाद आणि शरीफ पहिलवान यांचा इरादा होता. पण दोघांना गँगस्टर ऍक्टखाली अटक केल्यानंतर त्यांच्या अनेक गैरव्यवहारांची आणि माफियागिरीची पोल उत्तर प्रदेश पोलीसांनी खोलली आणि त्यांच्या संपत्तीवर पहिली कायदेशीर कारवाई करीत १६५ हेक्टर जमीन जप्त केली आहे.

    यापूर्वी योगी सरकारने आतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या बड्या माफियांवर कायद्याचा बडगा चालवत त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर, हॉटेलांवर आणि महालांवर बुलडोझर चालवून ते उध्वस्त केले आहेत.

    165 hectares of land seized from two more mafias in Uttar Pradesh; Lawsuit against Shamshad and Sharif Pahilwan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती