• Download App
    ऑगस्ट महिन्यात बँकांना १५ दिवस सुटी; सण, उत्सव आणि शनिवार, रविवारमुळे कर्मचाऱ्यांची चंगळ|15 days holiday for banks in August; Festivals, festivities and Saturdays, Sundays are a boon to the staff

    ऑगस्ट महिन्यात बँकांना १५ दिवस सुटी; सण, उत्सव आणि शनिवार, रविवारमुळे कर्मचाऱ्यांची चंगळ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये कोणत्याही कामासाठी तुम्ही बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार करत असाल तर १५ दिवस बँका बंद राहतील, याची नोंद घ्या. 15 days holiday for banks in August; Festivals, festivities and Saturdays, Sundays are a boon to the staff

    आपल्या बँक शाखेत भेट देण्यापूर्वी महत्त्वपूर्ण बँकांच्या सुटीची यादी तपासा.आरबीआय कॅलेंडरनुसार, आठवड्याच्या सुट्या सोडून ऑगस्ट महिन्यात एकूण आठ सुट्या आहेत. त्यामुळे बँकाचे कामकाज पंधरा दिवस विविध शहरात बंद राहणार आहे.



    ऑगस्ट महिन्यात विविध सण, उत्सव आणि सार्वजनिक सुट्यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. १ ऑगस्टला रविवार असल्याने सुटीपासून ऑगस्ट महिना सुरू होईल आणि बँका बंद राहतील.

    दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारी व्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात एकूण आठ सुट्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी रविवार आणि स्वातंत्र्य दिनामुळे सुटी असेल.पारशी नववर्ष (शहेनशाही) १६ ऑगस्टला आहे. त्यामुळे बेलापूर, मुंबई आणि नागपूर येथील बँकांना सुटी असेल.

    १९ रोजी मुहर्रम (अशोरा) असल्याने अनेक शहरात बँकेला सुटी असेल. त्यामध्ये अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर यांचा समावेश आहे.

    खालील सणामुळे सुटी

    १३ ऑगस्ट: देशभक्त दिन, १६ ऑगस्ट: पारशी नवीन वर्ष ,१९ऑगस्ट: मुहर्रम (आशुरा), २० ऑगस्ट: मुहर्रम / प्रथम ओणम, २१ ऑगस्ट: तिरुवोनम,
    २३ ऑगस्ट : श्री नारायण गुरु जयंती, ३० ऑगस्ट: जन्माष्टमी (श्रावण / कृष्ण जयंती), ३१ ऑगस्ट: श्रीकृष्ण अष्टमी

    दुसरा, चौथा शनिवार आणि रविवार सुटी

    १ऑगस्ट: रविवार, ८ ऑगस्ट: रविवार, १४ ऑगस्ट: दुसरा शनिवार ,१५ ऑगस्ट: रविवार ,२२ऑगस्ट: रविवार, २८ ऑगस्ट: चौथा शनिवार, २९ ऑगस्ट: रविवार

    15 days holiday for banks in August; Festivals, festivities and Saturdays, Sundays are a boon to the staff

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!