• Download App
    ऐन कोरोनात शेतकरी आंदोलकांचा देशव्यापी निषेध कार्यक्रम; आंदोलनास बारा विरोधी पक्षांचा पाठिंबा।12 opposition parties gave support to kissan morcha

    ऐन कोरोनात शेतकरी आंदोलकांचा देशव्यापी निषेध कार्यक्रम; आंदोलनास बारा विरोधी पक्षांचा पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : किसान मोर्चाने येत्या २६ तारखेला जाहीर केलेल्या देशव्यापी निषेध दिनाला काँग्रेससह देशातील १२ प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यादिवशी शेतकरी आंदोलनाला सहा महिने तसेच नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. 12 opposition parties gave support to kissan morcha

    केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक या पक्षांनी देशव्यापी निदर्शनांना पाठिंबा दर्शविला आहे.



    या बाबत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शरद पवार या ज्येष्ठ नेत्यांसह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलीन आणि हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. केंद्राने हटवादी भूमिका सोडावी आणि शेतकऱ्यांबरोबर तातडीने चर्चा सुरु करून कायदे मागे घ्यावेत, असे त्यात म्हटले आहे.

    शेतकऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण असून त्यास एकमुखी पाठिंबा असल्याचेही नमूद करण्यात आले. १२ मे रोजी पंतप्रधानांना याबाबत निवेदन देण्यात आले होते, असेही सांगण्यात आले.

    12 opposition parties gave support to kissan morcha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसाचार, गोळीबारात 4 जणांचा मृत्यू; शेख हसीना यांच्या गावी रॅलीदरम्यान निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

    Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता

    Operation Sindoor : 239 वेबसाइटवर 2 लाख सायबर हल्ले;‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरच्या सायबर हल्ल्यापासून 99 सरकारी संकेतस्थळे अद्यापही बंद