वृत्तसंस्था
ग्वाल्हेर : दक्षिण आफ्रिकेतून शनिवारी 12 चित्ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले आहेत. या चित्त्यांना भारतीय हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर कार्गो विमानातून आणण्यात आले. ग्वाल्हेर विमानतळाहून या चित्त्यांना ‘द कुनो नॅशनल पार्क’ या त्यांच्या नवीन घरी नेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 12 more leopards enter India from South Africa
दक्षिण आफ्रिका आणि भारतात सामंजस्य करार
यासंदर्भात चित्ता प्रकल्प प्रमुख, एस.पी. यादव म्हणाले की, शुक्रवारी रात्री 8.30 वाजता या 12 चित्त्यांना घेऊन सी-17 ग्लोबमास्टर या विमानाने जोहान्सबर्ग विमानाने उड्डाण केले. हे विमान शनिवारी सकाळी 10 वाजता ग्वाल्हेरच्या विमानतळावर लँड झाले. दक्षिण आफ्रिका आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारे चित्ता रीइंट्रोडक्शन प्रकल्पाचा भाग म्हणून चित्ते भारतात आणले जात आहेत. सामंजस्य करार भारतात व्यवहार्य आणि सुरक्षित चित्ता लोकसंख्या स्थापन करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चित्त्यांच्या आगमनाबद्दल आणि कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांची संख्या वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते. आता त्यात 12 चित्त्यांची भर पडल्यामुळे राज्यातील चित्त्यांची एकूण संख्या 20 झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांची संख्या वाढणार आहे. मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो, ही त्यांची दूरदृष्टी आहे, असे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.
12 more leopards enter India from South Africa
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगाचा निकाल : दोन आव्हाने; एक उद्धव ठाकरेंपुढे!!, दुसरे घराणेशाहीच्या प्रादेशिक पक्षांपुढे!!
- काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला; उद्धवना टोलवून शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर!!
- शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले, पण त्यांना चोरी पचणार नाही; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत टोला