• Download App
    असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी दिला १०१ बकऱ्यांचा बळी|101 goats sacrificed for the longevity of Asaduddin Owaisi

    असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी दिला १०१ बकऱ्यांचा बळी

    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीघार्युष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी दिला. या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.101 goats sacrificed for the longevity of Asaduddin Owaisi

    उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली होती.



    मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीला निघालेल्या खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

    ३ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थक त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीघार्युष्यासाठी प्रार्थना करत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली.

    101 goats sacrificed for the longevity of Asaduddin Owaisi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Punjab Gangster : पंजाबमध्ये गँगवार! गोळीबारात गँगस्टर जग्गूच्या आईसह ASIच्या मुलाचा मृत्यू

    Tej Pratap Yadav : लालू पुत्र तेजप्रताप यादव यांनी आता स्वतःला म्हटलं ‘किंगमेकर’

    Pak Handler : प्रिया शर्मा बनून नौदल कर्मचाऱ्याशी बोलायची पाक हँडलर; 50 हजारांत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली