विशेष प्रतिनिधी
लखनऊ : लव्ह जिहाद प्रकरणात दोषींना १० वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड केला जाईल असे आश्वासन उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.10 years imprisonment for convicts in love jihad case, assurance in BJP’s manifesto in Uttar Pradesh
भाजपच्या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.पाच वर्षांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरकारने राजकारणाला गुन्हेगारीकरणापासून पूर्णपणे मुक्त करण्याचे काम केले आहे.
तसेच उत्तर प्रदेशला प्रशासनाच्या राजकारणीकरणातूनही मुक्त केले. त्यामुळेच आम्ही आमच्या संकल्पपत्रातील सर्व वचने पूर्ण करू शकलो. गुन्हेगारीला आळा घालण्याचे हे काम भविष्यातही सुरूच राहणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर पाच हजार कोटींची कृषी सिंचन योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत पैसे दिले जाणार, विलंब झाल्यास त्या रक्कमेवर व्याज दिले जाईल,
राज्यातील प्रत्येक विधवा आणि निराधार महिलेला दर महिन्याला एक हजार ५०० रुपये पेन्शन मिळेल, सहा मेगा फूड पार्क तसेच पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सरदार पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान राबवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
10 years imprisonment for convicts in love jihad case, assurance in BJP’s manifesto in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- अरुणाचलच्या हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू
- कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; काँग्रेस पक्षाने हिजाबच्या बाजूने संसदेत मांडली भूमिका!!
- “पहले हिजाब, फिर किताब”; कर्नाटकातील वादाचे महाराष्ट्र बीड मालेगाव मध्ये पडसाद!!
- माझे पणजोबा देशसेवक, कोणाच्या सर्टिफिकेटची त्यांना जरूरत नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल