• Download App
    संसदेत कागद भिरकावणारे १० विरोधी खासदार निलंबित होणार, केंद्र आणणार प्रस्ताव|10 opposition MPs who threw papers in Parliament will be suspended, the Center will bring a proposal

    संसदेत कागद भिरकावणारे १० विरोधी खासदार निलंबित होणार, केंद्र आणणार प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेत गोंधळ करणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेगासस प्रकरण, नवे कृषी कायदे यांचा निषेध करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष व मंत्र्यांच्या दिशेने कामकाजाचे कागद भिरकावणाऱ्या विरोधी पक्षांच्या १० खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार आणणार आहे.10 opposition MPs who threw papers in Parliament will be suspended, the Center will bring a proposal

    लोकसभेमध्ये सरकार लवकरच निलंबनाचा प्रस्ताव सादर करणार आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची जास्त संख्या आहे.नवी कृषि कायद आणि पेगासस प्रकरणात खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता.



    काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचे खासदार लोकसभेत गदारोळ घालत असतानाही या सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी प्रश्नोत्तराचा तास सुरूच ठेवला होता. प्रश्नोत्तराच्या तासानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल त्यांच्या आसनावर विराजमान झाल्यावर त्यांच्या दिशेने कामकाजाचे कागद भिरकावले.

    काही काँग्रेस खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांवर कागद फेकले. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी साडेबारापर्यंत तहकूब करण्यात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी गोंधळ घातला.

    केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह म्हणाले, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या वर्तनामुळे संसदीय मयार्दांचा भंग झाला आहे. लोकसभा अध्यक्ष, मंत्री, अधिकारी यांच्याबाबत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जे गैरवर्तन केले तो सर्व प्रकार गंभीर आहे.

    भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, आपापल्या कुटुंबातील सदस्यांना वाचविणे इतकाच विरोधी पक्षातील नेत्यांचा उद्देश आहे. राहुल गांधी व प्रियांका गांधी राजकारणात जम बसवू पाहात आहेत. त्यासाठीच अशा प्रकारचे वर्तन काँग्रेस संसदेत करीत आहे.

    संसदेने आखून दिलेल्या मयार्दांचे काँग्रेसकडून सर्रास उल्लंघन सुरू आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. विरोधी पक्ष करीत असलेले नाटक जनतेला कळून चुकले आहे. पेगाससचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे राहुल गांधी म्हणतात.

    याचा अर्थ कोरोनाचा मुद्दा विरोधी पक्षांना कमी महत्त्वाचा वाटतो. पेगाससद्वारे पाळत ठेवण्यात आली असे जर काँग्रेसला वाटत असेल तर राहुल गांधी यांनी त्याबद्दल अद्याप न्यायालयात धाव का घेतली नाही? राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष धड चालविता येत नाही. त्यांच्यावर पाळत ठेवून कोणाला काय मिळणार आहे.

    10 opposition MPs who threw papers in Parliament will be suspended, the Center will bring a proposal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!