• Download App
    10 Instances in History When Prime Ministers of the Country Inaugurated Temples of Democracy,

    इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून विरोधकांनी राजकारणाला छेडले आहे. संसदेचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्याला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते, देशाच्या राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू. परंतु हेच विरोधक सोयीस्करपणे विसरत आहेत की, यापूर्वी देशातील लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन देशाच्या त्या-त्या वेळच्या पंतप्रधानांनी केले होते.

    यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते संबित पात्रा यांनीही ट्वीट करून विरोधकांच्या दाव्यांची चिरफाड केली आहे. त्यांनी तर ट्विटरवर असे अनेक उद्घाटनांचे प्रसंग फोटोंसह दिले आहेत, ज्यात देशाचे पंतप्रधान सहभागी होते. एवढेच नाही, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या कोणत्याही पदावर नसतानाही त्यांनीही लोकशाही मंदिरांचे उद्घाटन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

     

    1. देशाचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कर्नाटक विधानसभेची पायाभरणी केली होती. तेव्हा राज्यपालांनी हे केले नाही म्हणून कुणीही बहिष्कार टाकला नव्हता.

    2. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 ऑक्टोबर 1975 रोजी पार्लिमेंट हाऊस अॅनेक्सचे उद्घाटन केले होते. वास्तविक याची पायाभरणी 1970 मध्ये राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते करण्यात आली होती. उद्घाटन मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते.

     

    3. दि. 19 एप्रिल 1981 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन केले होते.

    4. 1987 मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनपी संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगची पायाभरणी केली होती.

    5. आता हे पाहा… भारताचे तत्कालीन पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या नव्या विधान भवनाचे उद्घाटन केले होते. यावर संबित पात्रा विचारतात की, कोणत्या अधिकाराने सोनिया गांधींनी विधानभवनाचे उद्घाटन केले? त्या काय राष्ट्रपती होत्या का? की मणिपूरच्या मुख्यमंत्री वा राज्यपाल होत्या?

    6. तामिळनाडूच्या विधान भवनाचेही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच उद्घाटन केले होते. मग त्यावेळी तामिळनाडूच्या तत्कालीन राज्यपालांना का मान दिला गेला नाही? असा सवालही पात्रा यांनी केला आहे.

     

    7. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बंगाल विधानसभेच्या प्लॅटिनम ज्युबिली मेमोरिअल बिल्डिंगचे उद्घाटन केले होते. मग त्यावेळी का कुणी बहिष्कार टाकला नाही?

    8. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्ली विधानभवनाच्या रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले होते. तिथे काही नायब राज्यपालांना हा मान दिला नव्हता. तेव्हा का कुणी बहिष्कार केला नाही?

     

    9. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनीही बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले होते.

    10. विशेष म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी स्वत: छत्तीसगड विधानसभेच्या इमारतीची पायाभरणी केली होती. यावर पात्रा यांनी पुन्हा सवाल केला आहे की, कोणत्या अधिकाराने वा छत्तीसगडच्या घटनात्मक पदावर नसतानाही सोनिया गांधी वा राहुल गांधी यांनी हे केले? तेव्हा का कुणी बहिष्कार टाकला नाही?

    10 Instances in History When Prime Ministers of the Country Inaugurated Temples of Democracy, Sonia Gandhi- Rahul Gandhi Laid the Foundation Even While Not in Office

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य