वृत्तसंस्था
अहमदाबाद : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने चार राज्यात विजय प्राप्त केला. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसच्या पोटात गोळा उठला आहे. 10 Congress MLAs on BJP’s path; There will be another shock before the Gujarat elections
भाजप विरोधात सर्व अशी निवडणूक पाच राज्यात झाली. हिंदुत्वाच्या जोरावर भाजपने निवडणूक जिंकली. काँग्रेस, डावे, तृणमूल, समाजवादी, बसपा, लिब्रांडू आदी मंडळी हिंदुत्वाच्या लाटेत भुईसपाट झाले. आता भाजपला गुजरात विजयाचे वेध लागले असून काँग्रेसमधील आमदारांना काँग्रेसमध्ये राम वाटत नसून खरा राम हा भाजपमध्ये असल्याचे आणि हिंदूंच्या मता शिवाय निवडून येण्याची शक्यता नसल्याची जाणीव झाली आहे. या व अन्य घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काॅंग्रेस मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सल्लागाराने असा दावा केला आहे की, भाजप काॅंग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीची माहिती काॅंग्रेस नेतृत्वाला देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे १० आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
10 Congress MLAs on BJP’s path; There will be another shock before the Gujarat elections
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी
- दापोलीत जाऊ या, अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया, किरीट सोमय्या यांची घोषणा
- राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे, आघाडीच्या आमदारांच्या सरबराईची अशोक गेहलोत करताहेत किंमत वसूल!
- दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले, अंदुरे आणि कळस्कर यांनीच गोळीबार केल्याचे सांगितले
- प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात