विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अयोध्या दौरा देशभर गाजत असताना दुसरीकडे बिहार, छत्तीसगड आणि केरळमध्ये त्या राज्यातल्या पुढार्यांच्या इफ्तार पार्ट्या जोरात झाल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी इफ्तार पार्ट्यांसाठी पुढाकार घेतला होता. या इफ्तार पार्ट्यांमध्ये हजारो मुस्लिमांनी सहभाग घेतला, पण त्या पलिकडे त्या प्रत्येक राज्यातले पक्षीय राजकारण या इफ्तार पार्ट्यांमध्ये रंगले. Iftar party politics in bihar, chattisghad and kerala
नितीश – तेजस्वी यांच्यात स्पर्धा
बिहारमध्ये हज हाऊस मध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूने इफ्तार पार्टी दिली. त्यावर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आपल्या मातोश्री माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय जनता दलातर्फे इफ्तार पार्टी दिली. त्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चिराग पासवान हे देखील सामील झाले. हज हाऊस मध्ये झालेल्या जेडीयूच्या इफ्तार पार्टीपेक्षा आपली पार्टी रंगतदार झाली पाहिजे, असा चंग तेजस्वी यादवांनी बांधला होता. तो त्यांनी राबडी देवींच्या घरी यशस्वी करून दाखवला.
भूपेश बघेल यांची इफ्तार पार्टी
छत्तीसगडमध्ये रायपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी इफ्तार पार्टी दिली. त्यांनी या इफ्तार पार्टीत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्याची चतुराई दाखविली. पण भाजपच्या महाचतुर नेत्यांनी त्या पार्टीकडे पाठ फिरवून स्वतः वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घेतले.
केरळ मध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील विरोधी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले होते. पण त्यातले दुसऱ्या फळीतले नेते हजेरी लावून पार्टीतून निघून गेले.
अल्पसंख्याकांमध्ये राजकीय मार्केटिंग
या सर्व इफ्तार पार्ट्यांचे वैशिष्ट्य असे की देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अयोध्या दौरा गाजत असताना या इफ्तार पार्ट्या झाल्या आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्यांकांमध्ये आपले राजकीय मार्केटिंग करून घेतले.
ध्रुवीकरणाचा लाभ कोणाला?
पण एकीकडे शिंदे – फडणवीसांच्या अयोध्या यात्रेत हिंदुत्वाची प्रचंड चर्चा रंगली असताना बिहार, छत्तीसगड आणि केरळ या भाजप विरोधकांच्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन इफ्तार पार्टी करणे याला निश्चित वेगळी राजकीय झालर होती. या इफ्तार पार्ट्या सभतर झाल्या पण आता त्याचा राजकीय लाभ संबंधित मुख्यमंत्र्यांच्या पक्षांना होतो की त्यांच्या राज्यांमध्ये राजकीय ध्रुवीकरण होऊन त्यांना राजकीय तोटा सहन करावा लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Iftar party politics in bihar, chattisghad and kerala
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे
- तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही!