विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॅंकामधील ठेवींवरील व्याजाचे दर कमी झाल्याने अनेकांना पैसे कोठे गुंतवावे याबाबात चिंता भेडसावत आहे. अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. मात्र तेथील अस्थिरतेची त्यांना धास्ती असते. अशांसाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत भारतीयांनी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरु केली आहे. तेथे गुंतवणूक करायची असल्याची काही बाबी मात्र नक्की विचारात घ्या. Four Tips for investing in mutual fund
१) एकरकमी मोठी गुंतवणूक टाळा
शेअर बाजारातील ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ या दोन्ही निर्देशांकाचे ‘पीई’ गुणोत्तर सर्वोच्च पातळीवर पोचले अशा वेळी कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ती रक्कम विभागून टप्प्याटप्प्याने गुंतवली पाहिजे.
उदाहरणार्थ, एका उत्तम फंडात एकरकमी पाच लाख रुपये गुंतविण्याऐवजी त्यातील एक लाख रुपये एकरकमी गुंतवून, त्याच फंडात दरमहा २५ हजार रुपयांची एक वर्ष कालावधीची ‘एसआयपी’ सुरु करावी. असे एकूण चार लाख रुपये गुंतवणूक करून काही कारणाने बाजार जर वेगाने कोसळला, तर खालच्या पातळीवर खरेदीसाठी एक लाख रुपये बाजूला ठेवावेत.
२) गोल्ड फंडातील संधी
गेल्या काही महिन्यांमध्ये ‘गोल्ड फंडां’च्या बाजारभावात घसरण झालेली दिसत आहे. शेअर बाजार जेव्हा कोसळतो, तेव्हा सोन्याचा भाव वाढतो, अशी आतापर्यंतची आकडेवारी दर्शविते. त्यामुळे आपल्या एकूण गुंतवणुकीचा काही भाग ‘गोल्ड फंडा’त नियमितपणे गुंतवायला हवा.
३) प्राप्तिकराचे नियम लक्षात घ्या!
ज्यांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची विक्री या आर्थिक वर्षात करायची असेल, त्यांनी या संदर्भातील प्राप्तिकराचे नियम तज्ज्ञ व्यक्तींकडून समजून घ्यावेत.
४) चांगले म्युच्युअल फंड विकू नका!
आपल्या पोर्टफोलिओतील खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड तसेच ठेवून चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याचा मोह गुंतवणूकदारांना होऊ शकतो. उदाहरणार्थ, गेल्या दहा वर्षांत सरासरी १८ टक्के वार्षिक परतावा देणारा एक फंड आणि फक्त ३ टक्के वार्षिक परतावा देणारा दुसरा म्युच्युअल फंड असे दोन फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील, तर त्यापैकी चांगली कामगिरी करणारा फंड विकून त्यावरील फायदा पदरात पाडून घ्यावा, असा विचार मनात येऊ शकतो. खरे तर गेल्या दहा वर्षांत चांगली कामगिरी करू न शकणारा म्युच्युअल फंड विकून टाकला पाहिजे आणि सातत्याने चांगली कामगिरी करणारा म्युच्युअल फंड न विकता त्यात अधिक गुंतवणूक करत राहिली पाहिजे.
Four Tips for investing in mutual fund
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात एक लाख घरेलू कामगारांच्या खात्यात जमा होणार दीड हजार रुपये, कोरोनामुळे सरकारची मदत
- निवडणुकीचा निकाल लागला आणि ५३ दिवसांनी ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून उतरून चालू लागल्या!
- आदर पूनावालांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? सोशल मीडियावर संताप
- ममतांच्या विजयाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आळवला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग