विशेष प्रतिनिधी
हैदराबाद :कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशातील सर्व राज्ये लॉकडाउन लागू करणे आणि कंटेन्मेंट झोन्स तयार करण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.States can decide regarding lockdown
त्या त्या राज्यांनी तेथील परिस्थीतीनुसार निर्णय घेण्यास सुरवातदेखील केली आहे. अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे तर काही र्जायंनी त्यात वाढ केली आहे.
सर्व राज्य सरकारांना कंटेन्मेंट झोन तयार करण्याची मुभा असून त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे रेड्डी यांनी नमूद केले.ते म्हणाले, की केंद्राकडून देण्यात येणारा ऑक्सिजनचा कोटा वितरित करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहणार आहे.
परदेशातून हवाई दलाच्या मदतीने ऑक्सिजन आणले जात असून लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना त्याचे वितरण केले जात आहे. कोरोनाला रोखणे हे लोकांच्या हातात आहे.
आपण केवळ लोकांवर उपचार करू शकतो, परंतु कोरोनाला रोखू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी वागावे, असे आवाहन त्यांनी केले.
States can decide regarding lockdown
महत्त्वाच्या बातम्या
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची का? ; मग शेवग्याची भाजी आवश्य खा
- फळांचा राजा आंबा औषधी गुणांची खाण, पक्व फळ हृदयाला हितकर; वात – पित्तशामकही
- कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दान केला ‘राधे-श्यामचा’ सेट; औषधं-ऑक्सिजन इ.सर्व खर्च करणार अभिनेता प्रभास
- आनंदाची बातमी : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’ लसीचीही निर्मिती !
- Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता