‘ओपी राजभर यांचा समाजवादी पक्षाबाबत मोठा दावा
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : सुहेलदेव भारतीय समाजवादी पार्टीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर (यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशातही मोठा खेळ होणार आहे, असे ते म्हणाले. Not only Maharashtra Uttar Pradesh can also have a big political game OP Rajbhars big claim about Samajwadi Party
ओपी राजभर यांनी दावा केला की “अनेक समाजवादी आमदार आणि खासदारांना पक्ष सोडून मंत्रीमंडळ विस्तारात सहभागी व्हायचे आहे, काही जण मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील. त्याचबरोबर लोकसभेचे तिकीट हवे असलेले अनेकजण दिल्ली ते लखनऊपर्यंत आपली फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत.
“पक्षाचे नेते आणि खासदार अखिलेश यादव यांच्या वृत्तीवर नाराज आहेत. लोक त्यांच्या भविष्याकडे पाहत आहेत, त्यांना माहित आहे की येथे भविष्य नाही. त्यांचे दोन खासदार पुढे येऊन नाराजी व्यक्त करत आहेत.’’ मात्र, राजभर यांनी नाराज खासदारांचे नाव घेतले नाही.
Not only Maharashtra Uttar Pradesh can also have a big political game OP Rajbhars big claim about Samajwadi Party
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिली पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- मोदींची 2019 ची मूळ योजना फलद्रूप; भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र, काँग्रेस एकाकी, त्यात ठाकरे – पवारांची भर!!