• Download App
    ZYDUS HOSPITAL LUNGS TEST : घर बसल्या करा फुफ्फुसांची चाचणी ; पहा व्हिडीओ आणि जाणून घ्या तुमच्या लंग्सचा नंबर ...।ZYDUS HOSPITAL LUNGS TEST : how to check health of your lungs in Corona Pandemic.

    ZYDUS HOSPITAL LUNGS TEST : घर बसल्या करा फुफ्फुसांची चाचणी ; पहा व्हिडीओ आणि जाणून घ्या तुमच्या लंग्सचा नंबर …

    सूचना: झायडस हॉस्पिटलद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओद्वारे केवळ फुफ्फुसाची चाचणी करण्याची पद्धत आहे. परंतू तुम्हाला कधीही जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा. ZYDUS HOSPITAL LUNGS TEST : how to check health of your lungs in Corona Pandemic.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील टॉपच्या हॉस्पिटलपैकी एक झायडस हॉस्पिटलने नुकताच एक फुफ्फुसांसाठी टेस्टिंग व्हिडीओ शेअर केला आहे. या अॅनिमेटेड व्हिडीओद्वारे फुफ्फुसाची टेस्ट कशी करावी याचा सोपा मार्ग दाखविण्य़ात आला आहे.

    कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक रुग्णांचा मृत्यू हा फुफ्फुसामध्ये व्हायरस पसरल्याने होत आहे. कोरोना व्हायरस खूप मोठ्या प्रमाणावर फुफ्फुसाला निकामी करतो. यामुळे त्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. डॉक्टरांनुसार कोरोनाचा नवीन म्युटंट खूपच खतरनाक आहे. याची लागण आधी गळ्यामध्ये होते. जर तुमच्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोनाचा थेट प्रसार हा फुफ्फुसापर्यंत होतो. तुमचे फिफ्फुस निरोगी आहे की नाही, किंवा ते किती ताकदवान आहे हे पाहणे गरजेचे आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५ ते ६ दिवसांत फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्याचे दिसू लागते. अशावेळी तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाची कशी काळजी घ्यावी, फुफ्फुस कसे स्वस्थ आणि शक्तीशाली बनवावे याची माहिती असणे गरजेचे आहे. सामान्यपणे फुफ्फुसाची स्थिती जाणून घेण्यासाठी एक्स-रे काढावा लागतो. मात्र, घर बसल्या फुफ्फुसाची चाचणी कशी करावी याची माहिती झायडस हॉस्पिटलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे.

    या व्हिडीओमध्ये १ते १० असे नंबर देण्यात आले आहेत. यामध्ये २ नंबरला सामान्य फुफ्फुस म्हटले आहे. तर ५ नंबरला स्ट्राँग फुफ्फुस म्हटले आहे. तर त्यापेक्षा जास्त म्हणजेच १० नंबरला सुपर लंग्स (फुफ्फुस) म्हटले आहे.

    तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे….

    • व्हिडीओ प्ले करा आणि तुमचा श्वास रोखून धरा.
    • यावेळी गोल फिरणाऱ्या लाल रंगाच्या चेंडूकडे पहा.
    • लाल चेंडू कितीवेळा गोल फिरतो त्यावरून तुम्हाला नंबर दिला जाणार आहे.
    • श्वास सुटल्यानंतरचा नंबर नोंद करा.
    • तुम्ही जेवढे जास्त वेळ श्वास रोखून धराल तेवढा जास्त जास्त नंबर असेल. म्हणजेच तेवढेच शक्तीशाली तुमचे फुफ्फुस असणार आहे.

    ZYDUS HOSPITAL LUNGS TEST : how to check health of your lungs in Corona Pandemic.

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती