• Download App
    झायडस कॅडीलाची लस १२ ते १८वयोगटातील मुलांना मिळणार ;केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती Zydus Cadillac vaccine will be available to childrens between the ages of 12 and 18; Govermet Of Indina told In Suprim Court

    Corona Vaccine : झायडस कॅडीलाची लस १२ ते १८वयोगटातील मुलांना मिळणार ;केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : झायडस कॅडीलाची लस १२ ते १८वयोगटातील मुलांना लवकरच दिली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.
    Zydus Cadillac vaccine will be available to childrens between the ages of 12 and 18; Govermet Of Indina told In Suprim Court

    झायडस कॅडिलाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली. ती आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवली असून २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. त्यासाठी केंद्र लस कंपन्यांकडून खरेदी करेल आणि त्या सर्व राज्यांना मोफत देईल असेही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

    भारतातील १८ वर्षांवरील लोकसंख्या ही अंदाजे ९३ ते ९४ कोटी आहे. त्यामुळे त लसीकरणासाठी १८६ ते १८८कोटी डोस लागतील, असा अंदाज आहे.जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरु झाले असून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसीचा वापर सुरू आहे.

    जगातील पहिली DNA आधारित लस

    झायडस कॅडीला ही भारतातील अग्रगण्य औषध कंपनी आहे. तिच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी,अशी विनंती केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) तशा प्रकारची विनंती केली असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे. झायडस कॅडीलाची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

    Zydus Cadillac vaccine will be available to childrens between the ages of 12 and 18; Govermet Of Indina told In Suprim Court

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!