zydus cadila covid vaccine : झायडस कॅडिला या स्वदेशी कंपनीने कोरोनावरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये कोविड-19 लससाठी क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या आहेत. zydus cadila covid vaccine Zycov-D seeks nod for its 3 dose needle free vaccine From DGCI
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : झायडस कॅडिला या स्वदेशी कंपनीने कोरोनावरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये कोविड-19 लससाठी क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
झायडस कॅडिलाने म्हटले की, कोरोनाविरुद्ध ही प्लाझ्मिड डीएनए लस आहे. कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल असा दावा करतात की, ही लस मंजूर झाल्यावर ती केवळ प्रौढच नव्हे, तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनादेखील देता येईल.
इंजेक्शनशिवाय देणार ZyCoV-D लस
बंगळुरूस्थित औषधनिर्माण कंपनीने म्हटले की, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. मंजूर झाल्यास कोरोना रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील पाचवी लस असेल.
तीन डोसची लस
डीएनए-प्लाझ्मिड आधारित ‘झायकोव्ह-डी’ लसीचे तीन डोस असतील. ही लस दोन ते चार डिग्री सेल्सियस तापमानात ठेवता येते, यामुळे कोल्ड चेनची आवश्यकता नाही. याद्वारे त्याची सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात वाहतूक होऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) अंतर्गत बायोटेक्नॉलॉजी विभागांतर्गत या लसीला नॅशनल बायोफार्मा मिशन (एनबीएम) यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण
झायडस कॅडिला लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. ही चाचणी 28,000 हून अधिक स्वयंसेवकांवर केली गेली आहे. क्लिनिकल चाचण्या दर्शवितात की, ही लस मुलांसाठी सुरक्षित आहे. कंपनीने चाचणी डेटा डीसीजीआयला दिला आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर, 12 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते.
zydus cadila covid vaccine Zycov-D seeks nod for its 3 dose needle free vaccine From DGCI
महत्त्वाच्या बातम्या
- डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पीएम मोदींचा लाभार्थींशी संवाद, कोरोना काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केले विशद
- केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज
- टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
- वारी पंढरीची : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं थोरातांचं वक्तव्य, पवार म्हणाले- तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा!