• Download App
    पाकिस्तान कनेक्शन : तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तुलाने अतीकची हत्या; सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही वापरले होते असेच पिस्तुल!!Zigana (Turkish) pistol was used in the murder of Atiq Ahmed and Ashraf Ahmed.

    पाकिस्तान कनेक्शन : तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तुलाने अतीकची हत्या; सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही वापरले होते असेच पिस्तुल!!

    प्रतिनिधी

    लखनौ : प्रयागराजचे गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन भावांच्या हत्येत अनेक धक्कादायक खुलासे होत असून त्यामध्ये एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे, तो म्हणजे अतीक आणि अशरफ या दोघांचीही हत्या तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तुलाने झाली आहे. हे त्याच बनावटीचे पिस्तूल आहे, जे सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी देखील वापरण्यात आले होते. सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या या पिस्तुलावर भारतात बंदी आहे. हे पिस्तूल पाकिस्तान मधून ड्रोन द्वारे भारतीय हद्दीत पोहोचले होते, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. Zigana (Turkish) pistol was used in the murder of Atiq Ahmed and Ashraf Ahmed.

    अतीक अहमद हा पोलिसांना आणि तपास यंत्रणांना काही महत्त्वाची माहिती देणार होता. त्याने पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबा यांच्याशी आपले थेट संबंध असल्याची कबुली दिली होती, इतकेच नाही तर पाकिस्तानातून पंजाब बॉर्डरवर ड्रोन द्वारे नेमकी कुठे शस्त्रे, पैसे आणि ड्रग्स येतात?, याची माहिती देखील अधिक तपास यंत्रणांना देणार होता. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष पंजाब बॉर्डरवर त्याला नेण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांना केली होती.

    आता त्याच्याच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुला संदर्भात काही तपशील त्याच्या हत्येप्रमाणेच धक्कादायक आहेत. तुर्की बनावटीची झिंगाना पिस्तूल भारतात बॅन आहे. त्याची किंमत साधारण 4 लाख रुपये आहे, इतकेच नाही तर ती पाकिस्तानातून ड्रोन द्वारे भारतीय हद्दीत टाकण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. याचा अर्थच अतीक आणि अशरफ अहमद यांच्या हत्येमागे वरवर दिसते तेवढे सर्वसामान्य गुंड माफियांचे कनेक्शन नसून त्यामागे अतीक पोलिसांना आणि तपास यंत्रणांना कोणाची माहिती देणार होता आणि त्यामुळे कोण एक्सपोज होणार होते??, याच्याशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट होते.

    Zigana (Turkish) pistol was used in the murder of Atiq Ahmed and Ashraf Ahmed.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट