• Download App
    Zeeshan Siddiqui झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    Zeeshan Siddiqui

    तब्बल १० कोटी रुपयांची मागणी, डी कंपनीचे नाव समोर आले


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: Zeeshan Siddiqui  बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पूर्णपणे शांत झालेले नाही आणि आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यास पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमकी पाठवणाऱ्यांनी झीशान सिद्दीकीकडून १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सध्या वांद्रे पोलिसांचे एक पथक झीशान सिद्दीकीच्या घरी पोहोचले आहे आणि त्याचा जबाब नोंदवत आहे.Zeeshan Siddiqui

    झीशान सिद्दीकीला आतापर्यंत तीन वेगवेगळे मेल पाठवण्यात आले आहेत, ज्यामध्ये पाठवणाऱ्याने डी कंपनीचा उल्लेख केला आहे. मेलमध्ये असेही लिहिले आहे की बाबा सिद्दीकीसोबत जे घडले ते तुमच्यासोबतही होईल. याशिवाय, मेलमध्ये असेही म्हटले आहे की बाबा सिद्दीकीच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोईचे नाव जोडले गेले होते, जे चुकीचे आहे. जर तुम्ही पैसे द्यायला तयार असाल तर तुम्हाला जागा सांगितली जाईल. तरी, मेल पाठवणाऱ्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. झीशान सिद्दीकी सध्या वांद्रे पोलिसांना जबाब देत आहे.



    बाबा सिद्दीकीची हत्या कधी झाली?

    १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या तीन हल्लेखोरांनी सिद्दीकीवर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून केली. बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकारणी होते. ते राष्ट्रवादीचे नेते होते आणि माजी मंत्री देखील होते. याशिवाय, ते बॉलिवूड आणि सेलिब्रिटी पार्ट्यांसाठी देखील ओळखले जात असे. त्यांच्या घरी मोठे कलाकार येत असत. त्यांचे शाहरुख आणि सलमानसह अनेक सेलिब्रिटींशी संबंध होते.

    Zeeshan Siddiqui receives death threats once again

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DGMO Rajiv Ghai : भारताचे DGMO राजीव घई कोण आहेत?:गेल्या वर्षीच जबाबदारी मिळाली, 33 वर्षे सैन्यात सेवा केली

    Karnataka : कर्नाटक काँग्रेसने जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवले; नंतर सोशल मीडिया पोस्ट काढून टाकली

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!