वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने झारखंडच्या माजी राज्यपाल आणि आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओडिशाच्या सत्ताधारी बिजू जनता दलाचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता वायएसआर काँग्रेसने द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचे सांगितले आहे.YSR Congress extended its support to Draupadi Murmu, strengthened her claim for the post of President
एनडीएने एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची दावेदार बनवल्यानंतर वायएसआर काँग्रेसने द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी रात्री जारी केलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा दावा वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर आता अधिक मजबूत होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा नामांकनात सहभाग
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या या प्रकाशनात द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदासाठी नामांकन दिल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. त्याचवेळी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असे सांगण्यात येत आहे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आज द्रौपदी मुर्मूंच्या नामांकनात सामील होऊ शकतात.
जिंकल्यास ठरतील भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी उभी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे वायएसआर काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार आहे.
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान भाजपसह अनेक पक्षांचे बडे नेते त्यांच्यासोबत उपस्थित राहू शकतात. दुसरीकडे, द्रौपदी मुर्मूंच्या उमेदवारी अर्जात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना फर्स्ट सेकंडर (प्रथम समर्थक) बनवण्यात आले आहे.
YSR Congress extended its support to Draupadi Murmu, strengthened her claim for the post of President
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला
- अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 3200 जण ठार, 1000 हून अधिक जखमी, भारत-पाकसह या देशांनी मदत केली जाहीर
- शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी सर्वाधिक तगमग पवार आणि राष्ट्रवादीची; शिवसेना – काँग्रेसचे राष्ट्रवादीवर शरसंधान!!
- आयती मिळालेली सत्ता निसटण्याची काँग्रेस – राष्ट्रवादीला धास्ती; संजय राऊतांच्या वक्तव्यावर मंत्र्यांची नाराजी!!