विशेष प्रतिनिधी
हिसार : लोकप्रिय यूट्यूबर म्हणून जगभरात प्रवासविषयक व्हिडिओंमुळे चर्चेत असलेली ज्योती मल्होत्रा उर्फ Travel With Jo आता गंभीर आरोपांमुळे तुरुंगात आहे. मे महिन्यात हिसार पोलिसांनी अटक केलेल्या मल्होत्रावर आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, पोलिसांनी तब्बल २५०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
तपासात समोर आले की मल्होत्राचे घनिष्ट संबंध पाकिस्तान उच्चायोगातील एहसान-उर-रहीम याच्याशी होते. त्याला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर प्रकरणानंतर हद्दपार करण्यात आला होता. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, रहीममार्फत ती संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे (ISI) पोहोचवत होती.याचबरोबर तिचे संबंध थेट आयएसआय हँडलर्स शाकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लों यांच्याशी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ज्योती मल्होत्रा वारंवार परदेश दौर्यावर जात असल्याचे पुरावेही समोर आले आहेत. एप्रिल–मे २०२४ मध्ये ती पाकिस्तानात गेली होती. जूनमध्ये तिने चीनचा दौरा केला. त्यानंतर नेपाळात तिचे वास्तव्य असल्याचे नोंदवले आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे करतारपूर कॉरिडॉर मार्गे पाकिस्तान दौर्यादरम्यान तिने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज शरीफ यांची मुलाखत घेतली होती, ज्यामुळे तिच्या भूमिकेविषयी संशय अधिकच गडद झाला.
तपास पथकाच्या सूत्रांनी सांगितले की, मल्होत्राच्या हालचाली आणि संपर्कांचे ठोस पुरावे त्यांच्याकडे आहेत. तिच्या डिजिटल उपकरणांमधून आणि संवादातून मिळालेल्या माहितीच्या आधारेच हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
तथापि, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत–पाक संघर्षाच्या काळात (चार दिवसांचा) तिच्याकडे थेट लष्करी गुप्त माहिती नव्हती. मात्र, तिच्याकडून मिळालेली इतर संवेदनशील माहिती देशविरोधी कारवायांसाठी वापरली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणामुळे Travel With Jo या नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबरची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. लाखो सब्स्क्राईबर्स असलेले तिचे चॅनल आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. न्यायालयीन लढाईत काय निष्पन्न होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
YouTuber ‘Travel With Jo’ Jyoti Malhotra secret face exposed
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत हुमायूं मकबरा परिसरात छत कोसळले, 6 जणांचा मृत्यू; डीएम म्हणाले- हे लोक ASIच्या जागेवर अवैध राहत होते
- हाय पॉवर डेमोग्राफी मिशन, समुद्र मंथन, मेड इन इंडिया जेट इंजिन… लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींच्या 9 मोठ्या घोषणा
- Akhilesh Removes Pooja Pal : अखिलेश यांनी आमदार पूजा पाल यांना सपामधून काढले; विधानसभेत म्हणाल्या होत्या- योगींनी अतिकला संपवले
- पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघा