यूट्यूबने संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहे. या यूट्यूब चॅनेलवरून लोकसभा आणि राज्यसभेचे थेट कामकाज आणि रेकॉर्ड केलेले कार्यक्रम दाखवले जातात. यूट्यूबच्या ‘समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे’ उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.YouTube blocked Parliament TV channel for violating guidelines, channel explanation Hackers change name
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : यूट्यूबने संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहे. या यूट्यूब चॅनेलवरून लोकसभा आणि राज्यसभेचे थेट कामकाज आणि रेकॉर्ड केलेले कार्यक्रम दाखवले जातात. यूट्यूबच्या ‘समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे’ उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
त्याचवेळी संसद टीव्हीच्या प्रसिद्धिपत्रकात चॅनल हॅक झाल्याचे म्हटले आहे. या सुरक्षा धोक्याचे निराकरण करण्यासाठी यूट्यूब काम करत आहे. मंगळवारी सकाळी संसद टीव्हीचे यूट्यूब खाते उघडले असता, ‘हे पृष्ठ उपलब्ध नाही’ अशी 404 एरर आली.’
संसद टीव्हीने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले?
चॅनल बंद झाल्यानंतर पार्लमेंट टीव्हीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यामध्ये संसद टीव्हीने दावा केला आहे की काही हॅकर्सनी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता त्याचे चॅनल हॅक केले आणि त्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला गेला. हॅकर्सनी संसद टीव्हीचे नाव बदलून ‘इथेरियम’ असे ठेवले. संसद टीव्हीच्या सोशल मीडिया टीमने त्यावर काम केले आणि पहाटे 3.45 पर्यंत ते पूर्ववत केले.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN), जी भारतातील सायबर सुरक्षेसाठी नोडल एजन्सी आहे, त्यांनीदेखील या प्रकरणाची माहिती दिली आणि संसद टीव्हीला सतर्क केले. YouTube ने नंतर सुरक्षिततेच्या धोक्यासाठी कायमस्वरूपी निराकरण करण्याचे काम सुरू केले आणि चॅनल शक्य तितक्या लवकर पुनर्संचयित केले जाईल.
YouTubeच्या गाइडलाइन्स काय आहेत?
यूट्यूबने चॅनेलसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ज्यामध्ये कोणत्या प्रकारचा मजकूर नसावा, हे सांगण्यात आले आहे. हे सर्व प्रकारचे व्हिडिओ, व्हिडिओवरील टिप्पण्या, लिंक्स आणि थंबनेल्सवरही लागू होते. प्लॅटफॉर्मनुसार, ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व लोकांसाठी समान आहेत. यामध्ये मशीन लर्निंग आणि लोकांचे रिव्ह्यू घेतले जातात. YouTubeच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, YouTube ला सुरक्षित समुदाय बनवणे आणि निर्मात्यांना त्यांचे अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देणे हे त्यांचे धोरण आहे.
YouTube blocked Parliament TV channel for violating guidelines, channel explanation Hackers change name
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल १४ वर्षापासुन अन्न न खाणारा अवलिया; खाद्य फक्त शेंगदाणे आणि गुळ खाऊन जगतो
- राऊतांची परिषद पत्रकार परिषद भाजपच्या साडेतीन नेत्यांना घेरण्यासाठी?? की महाविकास आघाडीत त्रासलेल्या शिवसैनिकांना गोळा करण्यासाठी??
- भारताला शेतकरी आंदोलनावरून उपदेश करणाऱ्या ट्रूडोंनी ट्रक चालकांच्या निदर्शनांमुळे कॅनडात लादली आणीबाणी
- असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारे आम्ही नाही, कोणाची झोप उडणार ते चार वाजेच्या आधीच कळेल, प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर पलटवार