विशेष प्रतिनिधी
इंदूर : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिससारख्या आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांच्या मनस्थितीवर तीव्र परिणाम झाला आहे. अनेक जण सैरभेर झाले आहेत.Young women threat for suicide
पतीला इंजेक्शन तातडीने मिळाले नाही तर रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून जीव देण्याची धमकी देणारा व्हिडिओ त्याच्या पत्नीने केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह काही वरिष्ठांना तसा व्हिडिओ पाठविल्यामुळे खळबळ उडाली.
रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेचे समुपदेशन केले. पण तिची मानसिक स्थिती बिघडली आहे. तिच्या पतीला ५९ इंजेक्शन देण्यात आली आहेत, पण आणखी गरज आहे. इंजेक्शन सध्या उपलब्ध नसल्यामुळे इतर औषधे दिली जात आहे.
या महिलेच्या ४० वर्षीय पतीवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्सन देण्यात आली आहेत, मात्र आणखी डोस देण्याची गरज आहे. त्यामुळे ही महिला तणावाखाली होती.
त्यातून तिने व्हिडिओ करून मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी आणि इंदूरचे आयुक्त मनीष सिंह यांचा उल्लेख करीत धमकी दिली. पतीच्या डोळे आणि जबड्यात संसर्ग झाल्याचे तिने नमूद केले.
Young women threat for suicide
महत्वाच्या बातम्या
- चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान
- ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण
- दिवसभरात शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी कमावले तब्बल तीन लाख कोटी, सेन्सेक्स पुन्हा ५० हजारांच्यावर
- पुणे सॅनिटाईज करण्याची महापालिकेची मोहीम , पावसामुळे रोगट वातावरण ; कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल