• Download App
    लव्ह यू जिंदगी म्हणत लोकांना उमेद देणाऱ्या तरुणीचा अखेर कोरोनाने मृत्यू|Young woman died from Corona who gave hope to people saying love you jindgi

    लव्ह यू जिंदगी म्हणत लोकांना उमेद देणाऱ्या तरुणीचा अखेर कोरोनाने मृत्यू

    स्वत: कोरोनाग्रस्त असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये उमेद निर्माण करण्यासाठी लव्ह यू जिंदगी म्हणणाऱ्या तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. एक कोरोना पीडित मुलगी लव्ह यू जिंदगी गात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुलीच्या या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले होते. पण आता ही मुलगीच कोरोनाविरुद्धची लढाई हरली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आहे.Young woman died from Corona who gave hope to people saying love you jindgi


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : स्वत: कोरोनाग्रस्त असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये उमेद निर्माण करण्यासाठी लव्ह यू जिंदगी म्हणणाºया तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. एक कोरोना पीडित मुलगी लव्ह यू जिंदगी गात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

    मुलीच्या या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले होते. पण आता ही मुलगीच कोरोनाविरुद्धची लढाई हरली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आहे.



    डॉ. मोनिका लांगेह यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या डिअर जिंदगीमधील ‘लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करत मोनिकाने लांगेहने लिहिले होते की,

    या मुलीला आयसीयू बेड मिळू शकला नाही, यामुळे ती कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये गेल्या 10 दिवसांपासून अ‍ॅडमिट आहे. तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच तिला रेमडेसिविर आणि प्लाज्मा थेरेपीही दिली जात आहे.

    ती एक मजबूत मुलगी आहे आणि जिच्यात मजबूत इच्छाशक्ती आहे. ती म्हणाली की, मी एखादे गाणे ऐकू शकते का, ज्याला मी परवानगी दिली. दरम्यान ही तरुणी दुदैर्वाने आपली आयुष्याशी सुरू असलेली झुंज जिंकू शकली नाही. ‘

    आपण एक शूर आत्मा गमावला आहे. ओम शांती. स्वत:च्या मुलीला कुटुंबियांनी गमावले आहे. त्यांना हे दु:ख सहन करण्याचे ताकद देवाने द्यावी.’ असे डॉ. मोनिका यांनी ट्विट करत म्हटले आहे.

    Young woman died from Corona who gave hope to people saying love you jindgi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!