• Download App
    तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार।young boy make news electric mask

    तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : तेलंगणमधील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यामधील एका २४ वर्षीय युवकाने अनोखा इलेक्ट्रिक मास्क तयार केला आहे. हा मास्क घरातच पोर्टेबल नेब्युलायझर म्हणून काम करू शकतो. कुचंल शिवा नागराजू असे या युवकाचे नाव आहे. young boy make news electric mask

    त्याने इतर मित्रांसोबत हा मास्क प्रत्यक्षात उतरविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बी.टेक. करणारे विद्यार्थीही यात सहभागी झाले. हा मास्क किंवा नेब्युलायझर हवा फिल्टर करून ती शुद्ध करतो. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णाला शुद्ध हवा मिळू शकते.



    या नेब्युलायझरमध्ये प्रवेश करणारी हवेच्या चेंबरमध्ये जाते. तिथे शुद्ध झाल्यानंतर ती औषधांच्या चेंबरमध्ये प्रवेश करते. त्यानंतर, आणखी एकदा शुद्ध झाल्यानंतर मास्कला जोडलेल्या एका छोट्या पाईपमधून ती रुग्णाला मिळते. त्यामुळे, रुग्ण दोनदा शुद्ध केलेली हवा श्वसनावाटे घेऊ शकतो. या इलेक्ट्रिक मास्कमध्ये नेहमीच्या कापडी मास्कचाही वापर करण्यात आला आहे.

    मास्कमधील हवेच्या पातळ पाईपसोबत हा कापडी मास्क बसविला आहे. मास्कला छोटे प्रवेशद्वार असून त्याला नेब्युलायझरचा पाईप जोडला आहे. हा नेब्युलायझर एका छोट्या लाकडी पेटीत बसविण्यात आला असून तो सहजपण हाताळता येतो. या पोर्टेबल नेब्युलायझर इलेक्ट्रिक मास्कची किंमत ६०० ते ७०० रुपये इतकी आहे.

    young boy make news electric mask

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा