• Download App
    तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते; संशयाचे जाळे घट्ट होताना पवारांचा व्हिडिओ व्हायरल You have to grab your chair

    तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते; संशयाचे जाळे घट्ट होताना पवारांचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरदनिष्ठ राष्ट्रवादी आणि अजित निष्ठ राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार होत असताना शरद पवार यांच्या भोवतीच त्यांच्या जुन्या जाणत्या निकटवर्ती यांनी संशयाचे जाळे विणले आहे. राष्ट्रवादीत फुटबिट काही पडली नसून शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपच्या आश्रयाला पाठवले असल्याचे वक्तव्य शरद पवारांचे निकटवर्ती चंद्रराव तावरे आणि शालिनीताई पाटलांनी केले यातून पवारांभोवतीचे संशयाचे जाळे गडद झाले आहे. You have to grab your chair

    हे संशयाचे जाळे गडद होत असतानाच शरद पवारांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शरद पवार तरुणांना उपदेश करताना, तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते. राजकारणात संधी सहज मिळत नाही. ती मिळवावी लागते. जेव्हा संधी येईल तेव्हा पटकन ती संधी घ्यावी घ्यावी लागते, नाहीतर आमच्यासारखे खुर्चीवरून सहज उठत नाहीत, असे शरद पवार त्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

    राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून अजितदादांसह 9 नेत्यांनी शिंदे – फडणवीसांच्या सरकार मध्ये जाऊन मंत्री पदाची शपथ घेतली. पण ते बंड नसून शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या केसेस मधून सोडवण्यासाठी त्यांना भाजपच्या आश्रयाला पाठवले आहे, असे वक्तव्य चंद्रराव तावरे आणि शालिनीताई पाटलांनी केले. चंद्रराव तावरे यांनी तर भाजपच्या नेतृत्वाला शरद पवारांपासून सावध राहण्याचा इशाराही दिला.

    या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भोवती असलेल्या संशयात अधिक भर पडली आहे.

    You have to grab your chair ; sharad pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : ब्रह्मोसने सुसज्ज INS दूनागिरी नौदलात समाविष्ट; अँटी सबमरीन INS अग्रय, INS संशोधक यांचाही समावेश; मोदी म्हणाले- ही नव्या भारताची सर्वात मोठी ताकद

    Shashi Tharoor : खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात; काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

    Pahalgam Attack : पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह