प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून शरदनिष्ठ राष्ट्रवादी आणि अजित निष्ठ राष्ट्रवादी असे दोन पक्ष तयार होत असताना शरद पवार यांच्या भोवतीच त्यांच्या जुन्या जाणत्या निकटवर्ती यांनी संशयाचे जाळे विणले आहे. राष्ट्रवादीत फुटबिट काही पडली नसून शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपच्या आश्रयाला पाठवले असल्याचे वक्तव्य शरद पवारांचे निकटवर्ती चंद्रराव तावरे आणि शालिनीताई पाटलांनी केले यातून पवारांभोवतीचे संशयाचे जाळे गडद झाले आहे. You have to grab your chair
हे संशयाचे जाळे गडद होत असतानाच शरद पवारांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शरद पवार तरुणांना उपदेश करताना, तुम्हाला तुमची खुर्ची हिसकावून घ्यावी लागते. राजकारणात संधी सहज मिळत नाही. ती मिळवावी लागते. जेव्हा संधी येईल तेव्हा पटकन ती संधी घ्यावी घ्यावी लागते, नाहीतर आमच्यासारखे खुर्चीवरून सहज उठत नाहीत, असे शरद पवार त्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून अजितदादांसह 9 नेत्यांनी शिंदे – फडणवीसांच्या सरकार मध्ये जाऊन मंत्री पदाची शपथ घेतली. पण ते बंड नसून शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या केसेस मधून सोडवण्यासाठी त्यांना भाजपच्या आश्रयाला पाठवले आहे, असे वक्तव्य चंद्रराव तावरे आणि शालिनीताई पाटलांनी केले. चंद्रराव तावरे यांनी तर भाजपच्या नेतृत्वाला शरद पवारांपासून सावध राहण्याचा इशाराही दिला.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भोवती असलेल्या संशयात अधिक भर पडली आहे.
You have to grab your chair ; sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!