• Download App
    उत्तर प्रदेशात महापौर, नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये योगींचा डंका, भाजपचा झेंडा!! Yogi's sting, BJP's flag in Uttar Pradesh Mayor, Municipal President elections

    उत्तर प्रदेशात महापौर, नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये योगींचा डंका, भाजपचा झेंडा!!

    प्रतिनिधी

    लखनौ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली असली तरी या पराभवाच्या काळ्या ढगांना उत्तर प्रदेशात महापौर, नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये सोनेरी किनार लाभली आहे. Yogi’s sting, BJP’s flag in Uttar Pradesh Mayor, Municipal President elections

    उत्तर प्रदेशात 17 महापालिकांच्या महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर नगरपालिकांच्या निवडणुकीत 199 पैकी 99 नगराध्यक्ष पदे भाजपने पटकावली असून समाजवादी पक्षाचे 37, बहुजन समाज पक्षाचे 20 नगराध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसला फक्त 4 नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे.


    ‘’उत्तर प्रदेशमध्ये माफिया आता…’’ अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचं विधान!


    कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री योगींचाच डंका वाजला आणि भाजपचा झेंडा फडकला. अलिगड, शहाजापूर, कानपूर, गोरखपूर, लखनऊ, मेरठ या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने समाजवादी पक्षाचा पराभव केला आहे.

    बरेली, आग्रा, मुरादाबाद या नगरपालिकांमध्येही समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने तिथली नगराध्यक्ष पदे समाजवादी पक्षाकडून खेचून घेतली आहेत. झाशी, सहारनपूर, मथुरा वृंदावन, कन्नौज, हस्तिनापूर मध्ये देखील भाजपनेच विजय मिळवला आहे. योगींचा चेहरा आणि भाजपचे संघटन याचा चांगला मिलाफ या निवडणुकीत दिसला आहे.

    Yogi’s sting, BJP’s flag in Uttar Pradesh Mayor, Municipal President elections

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’