• Download App
    योगींच्या यूपी मध्ये हलाल सर्टिफिकेशनला चाप; 9 कंपन्यांविरुद्ध लखनऊ मध्ये फौजदारी कायद्यानुसार एफआयआर!! Yogi's push for Halal certification in UP

    योगींच्या यूपी मध्ये हलाल सर्टिफिकेशनला चाप; 9 कंपन्यांविरुद्ध लखनऊ मध्ये फौजदारी कायद्यानुसार एफआयआर!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात हलाल सर्टिफिकेशनला चाप लावण्यात आला आहे. 9 कंपन्यांविरुद्ध पोलिसांमध्ये फौजदारी कायद्यानुसार एफआयआर दाखल झाले आहेत. स्वतः योगी आदित्यनाथ यांनी हलाल सर्टिफिकेशन मधील फ्रॉडची दखल घेऊन केस दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्पादन कोणतेही असो, हलाल सर्टिफिकेशन आमचेच घ्यावे लागेल, अशी मस्ती असणाऱ्या मुस्लिम आर्थिक संघटनांना चाप बसला आहे. Yogi’s push for Halal certification in UP

    हलाल आणि झटका हे मांसांचे प्रकार आहेत. मुस्लिमांमध्ये झटका मांस खाणे हराम मानले जाते. त्यामुळे मुस्लिम हलालच मांस खातात. या पलीकडे हलाल या संकल्पनेचा कोणत्याही उत्पादनांची काहीही संबंध नाही, पण मुस्लिमांची इकॉनोमी चालावी यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हलाल सर्टिफिकेशनचा मोठा बवाल उभा केला गेला.

    डेअरी प्रॉडक्ट, कपडा, क्रोकरी, फळे, साखर नमकीन, साबण सौंदर्यप्रसाधने अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा हलालशी कोणताही संबंध नसताना ते हलाल सर्टिफिकेशनशी मुद्दामून जोडले गेले. त्यातून मुस्लिम इकॉनॉमीचा मोठा धंदा उभा राहिला. काँग्रेसच्या राजवटीत तो कित्येक दशके चालत राहिला. पण आता योगी आदित्यनाथ यांनी स्वतः लक्ष घालून हलाल सर्टिफिकेशनला चाप लावण्याचे ठरविले आहे.

    लखनऊ मधले एक नागरिक शैलेंद्र शर्मा यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या एफआयआर मध्ये हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चेन्नई, जमीयत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट, दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया, मुंबई, जमीयत उलेमा महाराष्ट्र, मुंबई आदी संस्थांचा समावेश आहे. या सर्व या सर्व संस्था हलाल सर्टिफिकेशन जारी करतात.

    या संस्थांविरुद्ध 120 बी 153 ए 298 384 420 467 468 471 505 या फौजदारी कलमानखाली एफआयआर दाखल झाला आहे. ही सर्वच्या सर्व आर्थिक आणि धार्मिक फसवणुकीची कलमे आहेत. लखनऊ पोलिसांनी हा एफआयआर दाखल केल्यानंतर कोर्टात केस दाखल होईल आणि संबंधित संस्थांना समन्स पाठविले जाईल. त्यानंतर कोर्टात नियमितपणे केस चालू होईल.

    Yogi’s push for Halal certification in UP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!