• Download App
    Yogiraj Singh 'जर मी पंतप्रधान असतो तर मी शमा मोहम्मदला

    Yogiraj Singh : ‘जर मी पंतप्रधान असतो तर मी शमा मोहम्मदला देश सोडायला सांगितले असते…’

    Yogiraj Singh

    योगीराज सिंग यांनी काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना फटकारले?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Yogiraj Singh  भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या लठ्ठपणावर भाष्य करून काँग्रेस प्रवक्त्य शमा मोहम्मद यांनी स्वत:सह पक्षावर टीका ओढावून घेतली आहे. यावर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.Yogiraj Singh

    शमाने रोहित शर्माला सर्वात अकार्यक्षम भारतीय कर्णधार म्हटले आणि त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. यानंतर जेव्हा सर्वचस्तरातून टीका सुरू झाली तेव्हा शमा यांनी त्यांची एक्स पोस्ट डिलीट केली. तथापि, तोपर्यंत हा मुद्दा वाढला होता आणि क्रिकेट जगत आणि चाहत्यांनी काँग्रेस प्रवक्त्यांवर टीका केली होती. यामुळेच काँग्रेस प्रवक्त्यांना त्यांची पोस्ट डिलीट करावी लागली.



    योगराजचा राग भडकला –

    जेव्हा योगराज सिंह यांना या वादाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, काँग्रेस नेत्यास अशी विधाने करण्याची लाज वाटली पाहिजे. योगराज सिंह म्हणाले की, शमा यांनी देशाला अभिमानाचे क्षण देणाऱ्या व्यक्तीबद्दल विधान केले. योगराज सिंह म्हणाले की, जर ते पंतप्रधान असते तर त्यांनी शमा यांना देश सोडून जाण्यास सांगितले असते.

    Yogiraj Singh reprimands Congress spokesperson Shama Mohammed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!