कोरोनाच्या काळ्याकुट्ट कालखंडातही सेवाभावाची उज्वल किरणे नवी उमेद निर्माण करत आहेत. मृत्यूशी झुंज देत असलेल्या उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावनात्मक ट्विट केले आहे. जीवंत राहिलो तर पुन्हा सेवा देण्यासाठी हजर होईल, मात्र जर परत आलो नाही तर माझ्या मुलींना आशीर्वाद द्या, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. Yogiji, will serve again if survives, emotional tweet of Uttar Pradesh doctor to CM
विशेष प्रतिनिधी
मुजफ्फरनगर : कोरोनाच्या काळ्याकुट्ट कालखंडातही सेवाभावाची उज्वल किरणे नवी उमेद निर्माण करत आहेत. मृत्यूशी झुंज देत असलेल्या उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भावनात्मक ट्विट केले आहे. जीवंत राहिलो तर पुन्हा सेवा देण्यासाठी हजर होईल, मात्र जर परत आलो नाही तर माझ्या मुलींना आशीर्वाद द्या, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
गेल्या बारा वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. सचिन जैन यांना दहा दिवसांपूर्वी ड्युटीवर असतानाच कोरोनाची बाधा झाली. प्रकृती बिघडल्याने गंभीर अवस्थेत त्यांना दिल्लीतील मैक्स हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले. तेथूनच त्यांनी योगी आदित्यनाथ यांना ट्विट केले आहे.
डॉ. सचिन जैन हे गेल्या बारा वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे होमिओपॅथीची पदवी असली तरी अॅलोपॅथीचेही ज्ञान आहे. रुग्णालयात कार्यरत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाली. दोन दिवस होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
डॉ. सचिन यांनी योगी आदित्यनाथ यांना म्हटले आहे की, श्रीमान, माझ्या अभिनंदनाचा स्वीकार करा. कदाचित हे शेवटचे असेल. मी आपल्या प्रदेशातील छोटासा आरोग्य अधिकारी आहे. पूर्णपणे इमानदारीने काम करत असताना ड्युटीवरच मला कोरोनाचा झाला. सध्या दिल्लीतील मैक्स रुग्णालयात आहे. महोदय, जगलो वाचलो तर पुन्हा सेवेत निश्चितच हजर होईल.
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की परत येऊ शकलो नाही तर तुम्हाला भेटण्याच्या अपुऱ्या इच्छेने पुर्नजन्म घेईल. देवाकडे प्रार्थना करतो की तुमची प्रकृती उत्तम राहो. तुम्ही कधी मुजफ्फरनगरला आलात तर माझ्या दोन मुलींना आशिर्वाद द्या.
Yogiji, will serve again if survives, emotional tweet of Uttar Pradesh doctor to CM
महत्त्वाच्या बातम्या
- कैद्यापाठोपाठ आता आंध्रातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाची लागण, शरण येण्याचे आवाहन
- भारतात धार्मिक व राजकीय कार्यक्रमांतून कोरोनाचा फैलाव, ‘डब्लूएचओ’च्या अहवालात टीका
- जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू
- सिरमने कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर वाढवले, आता १२ ते १६ आठवड्यांनी घ्या दुसरा डोस
- लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका
- आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग