• Download App
    योगीच भाजपचे कर्मयोगी, ३९ दिवसांत १७९ सभा|Yogic BJP's Karmayogi, 179 meetings in 39 days

    योगीच भाजपचे कर्मयोगी, ३९ दिवसांत १७९ सभा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : दररोज सरासरी चार सभा आणि सतत ३० दिवस १७० सभा घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपणच भाजपचे कर्मयोगी असल्याचे सिध्द केले आहे. ‘मोदी हैं तो मुमकिन है, योगी हैं तो यकीन है…’ ही सध्या भाजपची उत्तर प्रदेशातील घोषणा बनली आहे.Yogic BJP’s Karmayogi, 179 meetings in 39 days

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी प्रचंड काम केले. परंतु, पक्षाच्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या परिश्रमाने एक उदाहरण ठेवले आहे. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत राज्याचे सातत्याने दौरे केलेच. उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू झाल्यावर स्टार प्रचारक म्हणून त्यांनी राज्यात झंझावती दौरे करून स्वत:ला कर्मयोगी म्हणून सिध्द केले आहे.



    योगी आदित्यनाथ यांनी गेल्या ३९ दिवसांत १७९ दौरे केले. यामध्ये जाहीर सभा आणि रोड शो यांचा समावेश आहे. त्यांच्या पाठोपाठ स्टार प्रचारक म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ८२ दौरे केले. दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी २६ दौरे केले. याशिवाय उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी ६९ दौरे केले.

    उत्तर प्रदेशातील निवडणुकांत भाजपचा मुख्य चेहरा योगी आदित्यनाथच आहेत. पक्षाला विश्वास आहे की त्यांची स्वच्छ आणि कठोर प्रशासक ही प्रतिमा निवडणुकीत फायदेशिर ठरेले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगीच उत्तर प्रदेशासाठी उपयोगी ठरतील, असे म्हटले आहे. ‘आएंगे तो योगी ही’ सारखी घशेषणा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांच्यावरील दाखविलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.

    एकूण पाच राज्यांतील निवडणुका होत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशाकडे कधीही दूर्लक्ष केले नाही. त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी उत्तर प्रदेशातच येतो.२१ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. त्याच दिवशी भाजपाच्या निवडणूक प्रचाराने जोर धरला.

    पंतप्रधानांनी २८ फेब्रुवारीपर्यंत २२ दौरे केले. यामध्ये जाहीर सभा, रोड शो यांचा समावेश आहे. मात्र, त्यांची एक सभा अनेक विधानसभा मतदारसंघासाठी होत होती.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्तर प्रदेशाची जबाबदारी सांभाळली. नड्डा यांनी ३९ तर शहा यांनी ५३ दौरे केले. मात्र, यामध्येही योगींचे दौरे सर्वाधिक होते. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत अवलंबलेल्या धोरणांमुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

    Yogic BJP’s Karmayogi, 179 meetings in 39 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही