विशेष प्रतिनिधी
लखनौ – अफगाणिस्तानात महिला व मुलांवर तालिबानकडून क्रूर अत्याचार केले जात आहेत. मात्र, काहीजण तालिबानला निर्लज्जपणे पाठिंबा देत आहेत. या पाठीराख्यांचे चेहरे उघड व्हायला हवेत अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तालिबानला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली.Yogi targets Taliban praisers
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकर रेहमान बार्क व इतर दोघांनी तालिबानच्या अफगाणिस्तान काबीज करण्याची तुलना भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली होती. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तालिबान समर्थकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात गेल्या चार वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट झाले. आमच्या सरकारने कोणत्याही भेदभावाशिवाय समाजातील प्रत्येकासाठी कल्याणकारी योजनांचा लाभ दिला, असा दावाही त्यांनी केला.
Yogi targets Taliban praisers
महत्वाच्या बातम्या
- अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले
- नेपाळच्या राजकारणात भूकंप, विरोधी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट
- शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा सीबीआयचा निर्णय़, न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल
- “तीन” वगळून काँग्रेसचे विरोधी ऐक्य; सोनियांच्या बैठकीचे आप, अकाली दल, बहुजन समाज पक्ष यांना वगळून 18 पक्षांना निमंत्रण