वृत्तसंस्था
लखनऊ : परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरांची नामांतरे करण्याचा धडाका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. त्यामध्ये आता अयोध्या नगरीच्या जवळ असणाऱ्या फैजाबाद रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे.Yogi renamed Faizabad railway station; Kejriwal too will come to Ramcharani in Ayodhya
फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. फैजाबाद रेल्वे स्थानक आता यापुढे आयोध्या कँन्ट या नावाने ओळखले जाईल.एकीकडे योगी सरकारने हा धडाकेबाज निर्णय घेतला असताना दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे अयोध्येत रामचरणी येणार आहेत. येत्या 26 ऑक्टोबरला अरविंद केजरीवाल यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला असून ते त्याच दिवशी रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना अरविंद केजरीवाल यांना रामलल्लांची आठवण होणे याला फार राजकीय महत्त्व आहे. कारण हेच ते अरविंद केजरीवाल आहेत की ज्यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवून मोठी राजकीय हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्यानंतर ते कधी वाराणसीकडे फिरलेले दिसले नाहीत.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी येऊन उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाची राजकीय हवा तयार करू पाहत आहेत. त्यांना रामलल्ला किती पावतात आणि आम आदमी पक्षाला किती यश मिळते हे पाच महिन्यानंतर दिसणारच आहे.
Yogi renamed Faizabad railway station; Kejriwal too will come to Ramcharani in Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या
- तुमच्याकडे आरोपी तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, कुठे गेला माहीत नाही, पण केस सुरू आहे; परमबीर सिंगांवरून उद्धव ठाकरेंचा टोला
- राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाने गाठले
- नितीन चौगुले – “जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?, याचा महाराष्ट्र सरकारने तपास करावा”
- भारत बायोटिक अनुनासिक कोरोना लसीबद्दल माहिती , मुलांच्या लसीसाठी DCGI कडून परवान्याची प्रतीक्षा
- नमाज पढणाऱ्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणांवर स्वरा भास्कर म्हणते – मला हिंदू असण्याची लाज वाटते!