• Download App
    गेल्या साडेचार वर्षांपासून उत्तरप्रदेशमधील जनतेला योगिनीं प्रचंड त्रास दिला आहे, मी अशा निर्दयी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार ; भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद | Yogi has caused a lot of trouble to the people of Uttar Pradesh for the last four and a half years, I will contest against such a ruthless Chief Minister ; Bhim Army Chief Chandrasekhar Azad

    गेल्या साडेचार वर्षांपासून उत्तरप्रदेशमधील जनतेला योगिनीं प्रचंड त्रास दिला आहे, मी अशा निर्दयी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार ; भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद

    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : यूपी विधानसभा निवडणुका संदर्भात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्याच जागेवरून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. 2019 मध्ये त्यांनी ही घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती.

    Yogi has caused a lot of trouble to the people of Uttar Pradesh for the last four and a half years, I will contest against such a ruthless Chief Minister ; Bhim Army Chief Chandrasekhar Azad

    माघार घेतल्याचे कारण सांगताना त्यांनी सांगितले होते की, मी पंतप्रधानच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी माझ्याकडे माझा पक्ष नव्हता. त्यामुळे मी तसे केले नाही. तसेच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मला विरोधी मतांचे विभाजन करण्याऐवजी मी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे नेहमी उत्तम राहील, असे सांगितले आणि मला ते पटले म्हणून मी माघार घेतली होती. असे चंद्रशेखर आझाद यांनी एनडीटीव्ही ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.


    CM YOGI IN ACTION: पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर योगी सरकारची मोठी कारवाई; देशद्रोहाचा खटला दाखल


    आगामी यूपी विधानसभेच्या निवडणुकीत भीम आर्मी त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशमधील प्रत्येक जागा लढवेल असेही त्यांनी सांगितले आहे. निवडणूक लढविण्याचा प्रश्नावर ते म्हणतात की, हे निर्णय पक्षाच्या मंडळाचे आहेत. इथं जर पक्षाने मला संधी दिली तर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या ठिकाणी निवडणूक लढवतील, त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.

    योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याचे कारण सांगताना ते म्हणतात की, त्यांनी गेल्या साडेचार वर्षांपासून उत्तरप्रदेशमधील जनतेला प्रचंड त्रास दिला आहे. मी अशा निर्दयी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार. आणि त्यांना सभागृहात येऊ देणार नाही. माझ्यासाठी विधानसभेत जाणे आवश्यक नाही पण योगींना थांबवणे महत्त्वाचे आहे. सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची पक्षाची तयारी सुरू आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

    Yogi has caused a lot of trouble to the people of Uttar Pradesh for the last four and a half years, I will contest against such a ruthless Chief Minister ; Bhim Army Chief Chandrasekhar Azad

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य