• Download App
    योगी सरकारचा मोठा निर्णय!, आतापासून वर्षातून दोनदा मोफत गॅस सिलिंडर मिळणार Yogi governments big decision From now on you will get free gas cylinders twice a year

    योगी सरकारचा मोठा निर्णय!, आतापासून वर्षातून दोनदा मोफत गॅस सिलिंडर मिळणार

    जाणून घ्या, कधी मिळणार आहेत हे दोन सिलिंडर?

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा :  उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून आता सर्वसामान्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. यावेळी दिवाळीत  सरकार दोन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू करणार आहे. निवडणुकीदरम्यान, योगी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे म्हटले होते, आता ही योजना दिवाळीपासून सुरू होणार आहे. Yogi governments big decision From now on, you will get free gas cylinders twice a year

    उत्तरप्रदेशच्या  मुख्य सचिवांनी या योजनेशी संबंधित प्रस्तावावर विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जेणेकरून ही योजना लवकरात लवकर सुरू करता येईल.  उज्ज्वला योजनेंतर्गत, यावेळी सरकार दिवाळीच्या दिवशी लाभार्थ्यांना एक मोफत सिलिंडर देणार आहे आणि होळीच्या दिवशी आणखी एक मोफत सिलिंडर दिला जाऊ शकतो. योगी सरकारने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

    उत्तर प्रदेशमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 75 लाख गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. यावेळी दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे खात्यात जमा करणार आहे. हे पैसे डीबीटीद्वारे गॅस कनेक्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील.

    Yogi governments big decision From now on you will get free gas cylinders twice a year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता