विशेष प्रतिनिधी
लखनऊ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक करताना योगी आदित्यनाथ यांनी 1.23 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन दिला आहे. त्याचप्रमाणे
पोषण मोहिमेअंतर्गत त्यांनी अंगणवाडी सेविकांना लहान मुलांची आरोग्य चाचणी करण्यासाठी 1.87 इंफंटोमिटर दिले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डिजिटल सक्षमिकरणासाठी हे इनिशिएटिव्ह घेतले गेले आहे.
Yogi distributed 1.23 smart phones among anganwadi workers
कोरोना काळात अंगणवाडी सेविकानी घरोघरी जाऊन प्रत्येक रुग्णाला औषधी किट पुरवल्या, फ्लूसारखी लक्षणे कोणाला आहेत, खोकला, सर्दी आणि तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांची यादी तयार केली. यामुळे जिल्हा मुख्यालयाला तसेच उत्तर प्रदेश सरकारला कोविडवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. सामूहिक कार्य करून आपण कोणत्याही मोठ्या आव्हानाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो, असे योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांना संबोधित करताना सांगितले.
योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीचे संकेतही दिले परंतु यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्याचे त्यांनी टाळले.
7 सप्टेंबर रोजी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 529 नवीन अंगणवाडी केंद्रांचे उद्घाटन केले होते. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 4,142 लाख आणि नव्याने निवडलेल्या 91 बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले होते.
Yogi distributed 1.23 smart phones among anganwadi workers
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-पुण्यात झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रचार – प्रसार; मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केली चिंता
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी