विशेष प्रतिनिधी
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई आले. 5 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. माध्यमांनी रसभरीत वर्णन केले… पण हे कसे घडले…??, याची कहाणी मात्र विलक्षण वेगळी आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या राजकीय इतिहासाला छेद देणारी आहे. Yogi came to Mumbai, with an investment of 5 lakh crores
उत्तर प्रदेश राज्याचा राजकीय इतिहास गेली 60 वर्षे तरी हिंसाचार, मागासलेपणा, जातीपातीचे राजकारण, गुंडांच्या जातीय टोळ्या, धर्मांधांच्या दंगली यांनी ग्रासला होता. 2017 मध्ये जनमताच कौल घेऊन योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी 5 वर्षात चित्र बदलून दाखवले. गुंड गँगस्टर च्या मालमत्तांवर प्रसंगी बुलडोझर चालवले. पण कायद्याचे राज्य आणले आणि इथून पुढेच उत्तर प्रदेशाचा राजकीय इतिहास बदलायला सुरुवात झाली.
आज उत्तर प्रदेशाला उद्योग प्रेमी राज्य बनवण्याचा ध्यास योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. याचा प्रत्यय त्यांच्या 2 दिवसातल्या मुंबई दौऱ्यात आला. महाराष्ट्रातल्या उद्योगपतींनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि त्यांना उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची या उद्योगपतींनी विशेष प्रशंसा केली. योगी आदित्य नाथांनी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेची आणि पायाभूत सुविधांची हमी दिली.
रिलायन्स, टाटा सन्स, अदानी, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आणि रामकी यांच्यासह तब्बल 2 डझनहूनही जास्त अधिक उद्योजकांनी योगींची भेट घेतली.
योगी आदित्यनाथ हे तब्बल 5 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक (Investment) आपल्या राज्यासाठी घेऊन गेल्याचे वर्णन माध्यमांनी केले. जो उत्तर प्रदेश काही वर्षांपूर्वी गुंड टोळ्यांच्या नावाने ओळखला जायचा, त्या उत्तर प्रदेशात आता टाटा, अदानी, अंबानी, गोदरेज, महिंद्रा, पिरामल ही नावे मोठ्या प्रमाणावर दिसणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये महाराष्ट्रातील उद्योगपतींना योगींनी निमंत्रण दिले आहे. या ठिकाणी उद्योगांबाबत मोठे करार होणार आहेत.
अंबानी इलेक्ट्रॉनिक्स ग्रीन लाईट 5g मध्ये
रिलायन्स इंडस्ट्री समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि ग्रीन लाईट सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी योगींपुढे प्रस्ताव दिला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशात 5G इंटरनेट सेवा पुरवणे, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या साहाय्याने उत्तर प्रदेशातील गावांत दर्जेदार आरोग्याच्या सेवा पुरविणे असा प्रस्ताव आहे.
अदानी मेडिकल कॉलेज सुरू करणार
अदानी समूह सार्वजनिक-खासगी अशा दुहेरी पद्धतीने मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे. नोएडा भागात जवळरास 10 हजार तरूणांसाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना होणार आहे.
अदानी उद्याग समूहाचे करण अदानी यांच्याकडून वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक सेक्टरमध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी सिमेंटचे कारखाने सुरू होतील, अशी चर्चा झाली. अदानींकडून बलिया जिल्हा आणि श्रावस्ती या ठिकाणी पीपीपी पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालचा प्रस्ताव दिला आहे.
बिर्ला समूह उभारणार कन्व्हेन्शन सेंटर
बिर्ला समूहाकडून कुमार मंगलम बिर्ला यांनीही योंगींना सहकार्य मागितले आहे. नोएडा येथे कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्याच त्यांचा मानस आहे. हे कन्व्हेन्शन सेंटर जगाभरातील एक मोठे कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक असेल असेही त्यांनी सांगितले. फूड प्रोसेसिंग, डेटा सेंटर्स, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी बिर्लांनी रस दाखवला.
टाटा समूहाची विमान सेवा, हॉटेल्स मध्ये गुंतवणूक
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही योगींशी चर्चा केली. उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आघाडीवर त्यांना चर्चा झाली. ते म्हणाले की, एअर इंडियाची सेवेची विमानसेवा उत्तर प्रदेशातल्या विमानतळांवर उपलब्ध केले जाईल. तसेच, आध्यात्मिक महत्त्वाच्या तीर्थस्थळांवर सगळ्या ठिकाणी हॉटेल्स बांधण्याची टाटा समूहाची तयारी आहे.
Yogi came to Mumbai, with an investment of 5 lakh crores
महत्वाच्या बातम्या