• Download App
    कोरोना संकटात घरी बसलेल्या राज्यकर्त्यांसमोर योगी आदित्यनाथ यांचा आदर्श, गावात जाऊन केली कोरोनाबाधितांची विचारपूस|.Yogi Adityanath's role model in front of the rulers sitting at home in the Corona crisis.

    कोरोना संकटात घरी बसलेल्या राज्यकर्त्यांसमोर योगी आदित्यनाथ यांचा आदर्श, गावात जाऊन केली कोरोनाबाधितांची विचारपूस

    कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक राज्यांतील राज्यकर्ते घरात बसून आहेत. घरूनच आघाडी सांभाळत असल्याचे सांगत आहेत. त्यांच्यासमोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदर्श ठेवला आहे. योगींनी थेट गावात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली..Yogi Adityanath’s role model in front of the rulers sitting at home in the Corona crisis.


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक राज्यांतील राज्यकर्ते घरात बसून आहेत. घरूनच आघाडी सांभाळत असल्याचे सांगत आहेत.

    त्यांच्यासमोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदर्श ठेवला आहे. योगींनी थेट गावात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली.कोरोनाचा कहर देशात सुरू झाला आहे.



    महाराष्ट्रा सारख्या राज्यात तर दररोजची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, या काळात राज्यकर्ते घरात बसून आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलत नाही. कोणासमोर गाऱ्हाणे मांडायचे हा प्रश्न लोकांसमोर पडला आहे. त्यांच्यासमोर योगी आदित्यनाथ यांनी आदर्श ठेवला आहे.

    उत्तर प्रदेशनचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाचा फैलाव झालेल्या भागातील रुग्णांच्या आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेतला. मुरादाबाद जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला. कोविड कमांड सेंटरचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक मनोहरपूर गावात जाण्याचे ठरविले.

    त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र, तरीही मुख्यमंत्र्यांचा ताफा गावात पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी गाडीतून उतरून चालत गावातील वस्त्यांच्या दिशेने प्रयाण केले. मुख्यमंत्र्यांनी घरांसमोर उभे राहून गावकऱ्यांची खुशाली विचारली.

    औषधे मिळालीत का, कोरोनापासून बचावासाठी उपाय करत आहात का, याबाबत विचारणा केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंटिग्रेटेड कोविड कमांड सेंटरचा दौरा केला.

    त्यानंतर सर्किट हाऊसमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मुरादाबाद विभागातील अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबच त्यांनी व्हर्चुअल बैठक घेतली.

    उत्तर प्रदेशमधील कोरोनाची लाट काहीशी ओसरली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे २६ हजार ८४७ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार एवढी आहे.

    गेल्या आठवडाभरात राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे ६० हजारांनी घट झाली आहे.योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यामुळे या भागातीलच नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाशी लढणाºया आरोग्य कर्मचाºयांना बळ मिळाले आहे.

    .Yogi Adityanath’s role model in front of the rulers sitting at home in the Corona crisis.

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही