• Download App
    योगी आदित्यनाथ यांचे ऑपरेशन दुराचारी देशभर राबवावे, कॉँग्रेस खासदारांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने केले कौतुक|Yogi Adityanath's operation Durachari should be carried out across the country, praised by Parliamentary Committee chaired by Congress MPs

    योगी आदित्यनाथ यांचे ऑपरेशन दुराचारी देशभर राबवावे, कॉँग्रेस खासदारांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राबविलेल्या मॉडेलचे कॉँग्रेस खासदाराच्या नेतृत्वाखालील संसदीय त्यांच्या कार्याबद्दल विरोधकांकडून दाद मिळत आहे. काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने कौतुक केले आहे.Yogi Adityanath’s operation Durachari should be carried out across the country, praised by Parliamentary Committee chaired by Congress MPs

    उत्तर प्रदेशातील हे मॉडेल देशभर राबविण्याची शिफारसही केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या घटनांचे भांडवल करून सरकारची बदनामी करणाऱ्या प्रियंका गांधी यांना कॉँग्रेस नेत्यानेच उत्तर दिले आहे.उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजनांचे कौतुक करण्यात आले आहे.



    सर्व राज्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडून धडा घ्यावा, असेही म्हटले आहे. ज्येष्ठ कॉँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने हा अहवाल दिला आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात अनेक विभागांचे विलीनीकरण करून ‘सिंगल विंडो सिस्टीम’ स्थापन करण्यात आली.

    त्यामुळे सर्व विभागांत समनव्य साधण्यात आला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन दुराचारी’ सुरू केले. याअंतर्गत महिलांविरोधात गुन्हे करणाºया सराईतांची पोस्टर्स पोस्टर्स रस्त्यावर लावण्यात आली होती.

    सीएम योगी लोकांना या गुन्हेगारांच्या कृत्यांविषयी माहिती मिळाली पाहिजे. सामाजिक पातळीवर बदनामी होऊ लागल्याने याप्रकारचा गुन्हा करताना गुन्हेगार दहा वेळा विचार करू लागले. त्याचबरोबर महिलांचा होणारा पाठलाग आणि छेडछाड रोखण्यासाठी रोमिओविरोधी पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.

    उत्तर प्रदेशातील एका नेत्याने सांगितले की, उत्तर प्रदेश आता इतर राज्यांसमोर उदाहरण ठेवत आहे. हिंसाचार पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून राज्याने प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ सुरू केले आहेत. याचा लाभ आतापर्यंत एक लाखांहून अधिक महिलांना झाला आहे.

    तात्पुरत्या निवारा आणि मानसिक समुपदेशनापासून कायदेशीर मदत आणि वैद्यकीय उपचारांपर्यंतची व्यवस्था या केंद्रांमध्ये केली जाते.महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कठोर शिक्षाही दिली जात आहे. त्यामुळे बलात्कारांच्या घटनांत घट झाली आहे.

    Yogi Adityanath’s operation Durachari should be carried out across the country, praised by Parliamentary Committee chaired by Congress MPs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार