• Download App
    योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची रक्तपिपासू राक्षसाची तुलना, माजी राज्यपालांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा|Yogi Adityanath's government compares bloodthirsty monster, treason case against former governor

    योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची रक्तपिपासू राक्षसाची तुलना, माजी राज्यपालांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला रक्तपिपासू राक्षस म्हणणारे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपमानास्पद टीका केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Yogi Adityanath’s government compares bloodthirsty monster, treason case against former governor

    रामपूर जिल्ह्यातील सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ते आकश सक्सेना यांचनी दिलेल्या तक्रारीनंतर कुरैशीविरोधात गुन्हा दाखल केला गेला. माजी राज्यपालांवर देशद्रोह (१२४ ए), धर्म आणि जातींमध्ये तणाव वाढवल्याच्या आरोपाखाली कलम १५३ ए आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला आव्हान देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी १५३ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.



    सक्सेना यांनी त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, कुरैशी हे माजी मंत्री आजम खान यांच्या घरी आमदार तंजीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री योगी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना ही रक्त पिणाऱ्या राक्षसासोबत केली होती. सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं की, कुरैशी यांचे वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकते आणि दंगलही होऊ शकते.

    रामपूरचे नेते आणि माजी मंत्री आजम खान हे सध्या तुरुंगात आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुरैशी हे उत्तराखंड, मिझोरामचे राज्यपाल होते. २०१२ ते २०१५ या कालावधीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून ते काँग्रेस खासदार होते.

    Yogi Adityanath’s government compares bloodthirsty monster, treason case against former governor

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका