विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळच्या वायनाड मध्ये भूस्खलन ग्रस्तांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली. त्याचा त्यांनी कुठेही गाजावाजा केला नाही. त्या संदर्भातल्या बातम्याही फारशा कुठे आल्या नाहीत. परंतु केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. ते पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे योगींनी केलेल्या मदतीची वाच्यता बाहेर झाली. Yogi Adityanath Waynad help 10 crore
वायनाड लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मतदारसंघ. 2019 आणि 2024 या दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी त्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. तिथे देशातले अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लिम बहुसंख्यांक आहेत. यावरून देशात मोठे राजकीय टीका टिप्पणी देखील झाली. परंतु, दीड महिन्यापूर्वी त्या मतदारसंघात मोठे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी आदी नेत्यांनी त्या भागाचा दौरा केला. केंद्र सरकारने भूस्खलनग्रस्तांना भरघोस मदत केली.
योगी आदित्यनाथ यांनी देखील भूस्खलन ग्रस्तांना 10 कोटींची मदत केली. मात्र त्याचा कुठे गाजावाजा केला नाही. फारशा कुठे त्याच्या बातम्याही आल्या नाहीत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी योगींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. त्यामध्ये त्यांनी भगवद्गीतेचा श्लोक लिहिला. त्यामुळे खान यांच्या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. योगींनी केलेल्या मदतीची त्यामुळे सगळ्यांना बातमी समजली.
Yogi Adityanath Waynad help 10 crore
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले