• Download App
    Yogi Adityanath राहुल गांधींसारखे "नमुने" राजकारणात राहिले पाहिजेत, त्यामुळे...; योगी आदित्यनाथांचा टोला!!

    Yogi Adityanath राहुल गांधींसारखे “नमुने” राजकारणात राहिले पाहिजेत, त्यामुळे…; योगी आदित्यनाथांचा टोला!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राहुल गांधींसारखे “नमुने” भारतीय राजकारणात राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना हाणला, पण काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेत राहुल गांधींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर द्यायची गरज नाही, असे सांगितले.

    योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला उत्तर प्रदेशात आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेने योगींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत वेगवेगळ्या प्रश्नांच्या फैरीला योगींनी तितकीच तडफदार उत्तरे दिली. या मुलाखती दरम्यान राहुल गांधींविषयी प्रश्न विचारल्याबरोबर योगी म्हणाले, भारताच्या राजकारणात राहुल सारखे “नमुने” राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो. राहुल गांधी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मते व्यक्त करतात त्यामुळे जनतेचे मनोरंजन होते, पण जनतेला आमचे महत्त्वही समजते. म्हणून जनता आम्हाला सत्ता देते, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना हाणला.



    उत्तर प्रदेशातील संभलच्या मुद्द्यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आतापर्यंत तिथल्या खोदकामांमध्ये 54 मंदिरे सापडली. आम्ही आणखी खोदकाम करू. आणखी मंदिरे सापडतील. संभल मधले सत्य जगासमोर आणू. आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या हे सत्य जगाला समजू द्या.

    मथुरेचाही लवकरच नंबर लागेल कारण ती श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करतो, नाहीतर आतापर्यंत तिचे काही वेगळेच घडू शकले असते, असा इशाराही योगी आदित्यनाथ यांनी दिला. उत्तर प्रदेशात मुस्लिम समाज सर्वात जास्त सुरक्षित आहे. जोपर्यंत हिंदू सुरक्षित आहे, तोपर्यंत मुस्लिम समाजही सुरक्षित आहे, असे गंभीर वक्तव्य देखील योगी आदित्यनाथ यांनी केले.

    Yogi Adityanath Target to Rahul gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sundar Pichai, : सुंदर पिचाई म्हणाले- AI एक दिवस सीईओची जागा घेईल; म्हटले- प्रत्येक व्यवसायात AI वापर शिकून घेणे आवश्यक; जे स्वीकारतील ते इतरांपेक्षा चांगले काम करतील

    Ludhiana :लुधियानामध्ये दहशतवाद्यांचा एन्काउंटर, एकाला 3, तर दुसऱ्याला 1 गोळी लागली, PAK टेरर मॉड्यूलशी कनेक्शन

    Robert Vadra, : मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; ईडीने युकेस्थित संजय भंडारींशी संबंधित प्रकरणात आरोपी केले