• Download App
    Yogi Adityanath पाकिस्तानपुढे दोनच पर्याय, भारतात विलिनीकरण किंवा नष्टचर्य

    Yogi Adityanath : पाकिस्तानपुढे दोनच पर्याय, भारतात विलिनीकरण किंवा नष्टचर्य; योगींचा तडाखा!!

    Yogi Adityanath

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जन्मापासून फक्त दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानपुढे आता दोनच पर्याय शिल्लक उरतील, भारतात विलिनीकरण करणे किंवा नष्ट होणे, अशा परखड शब्दांचा तडाखा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath  यांनी आज हाणला. Yogi Adityanath Partition Horrors Remembrance

    14 ऑगस्ट पाकिस्तान निर्मितीमुळे झालेल्या फाळणीच्या वेदना विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी परखड शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानला एकतर भारतात विलीन व्हावे लागेल किंवा तो देश नष्ट होईल, असे योगी म्हणाले.

    मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. फाळणीसाठी काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. काँग्रेसला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्यांनी देशाचा गळा दाबला. त्यांच्या पापाला कधीही माफी दिली जाऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22 % हिंदू होते. आज हा आकडा 7 % उरला आहे. भारत या हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे आणि उभा राहील पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या हिंदूंना न्याय देण्यासाठीच अखंड भारताचा स्वप्नच त्यावरील उपाय असल्याचे योगी म्हणाले.


    अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या- कर शून्य असावा, पण अनेक आव्हाने आहेत, संशोधनासाठीही निधी लागतोच


    1947 मध्ये जर भारताच्या राजकीय नेतृत्वाकडे मजबूत इच्छाशक्ती असती, तर जगातील कोणतीही ताकद अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. कारण अखंड भारत ही मुळातच अध्यात्मिक चेतना आहे. ती फक्त भौतिक चेतना नाही, पण काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेच्या मोहाने देशाला बरबाद केले. त्यांच्याकडे सत्ता गेली, त्यावेळी त्यांनी देशाच्या बदल्यात राजकारण केल्याचा हल्ला योगींनी चढवला.

    पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावून जल्लोष करत असताना फाळणीमुळे असंख्य लोकांना आपली जन्मभूमी, मातृभूमी सोडावी लागत होती. पण काँग्रेसच्या नेत्यांना त्याबद्दल पश्चाताप झाला नाही असे टीकास्त्र योगींनी सोडले. मागील 10 वर्षातील भारताच्या प्रगतीचा गौरव करताना त्यांनी सांगितले, मागील 10 वर्षात भारताने केलेल्या प्रगतीमुळे जग अचंबित झाले आहे. त्यामुळे जगात कुठेही संकट आले तरी आता मदतीसाठी भारताकडे पाहिले जात आहे. 2047 चा भारत हा अखंड आणि सर्व बाजूंनी बळकट असेल, अशी ग्वाही योगींनी दिली.

    Yogi Adityanath Partition Horrors Remembrance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’

    Icon News Hub