नाशिक : जिहादी जातिवादाचे थैमान आणि दंगलींचे राज्य अशी ओळख बनलेल्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या आठ वर्षात बुलडोझर बाबा म्हणून प्रख्यात झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशाची प्रतिमा आणि चेहरा मोहरा कसा बदलला??, त्याची कहाणीच समोर आली.
उत्तर प्रदेशात योगी बाबांनी तब्बल 54 PAC म्हणजे उत्तर प्रदेश प्रादेशिक आर्म कॉन्स्टेबलरीचे पुनरुज्जीवन केले. तब्बल दोन लाख 16 हजार पोलीस भरती केली. त्याद्वारे राज्यातल्या दंगेखोरांना जरब बसवून राज्यात कायदा सुव्यवस्था कायम केली.
2017 पूर्वी उत्तर प्रदेशची ओळख जिहादी जातीयवादाचे थैमान आणि दंग्यांचे राज्य हीच होती. जिकडे तिकडे मोठमोठे मिनार उभे राहत होते आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्या मिनारांची उंची वाढत होती. मदरशांची संख्या वाढत होती. पोलीस भरतीमध्ये यादवांना प्राधान्य होते, तर प्रदेशातल्या 76 जिल्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक पदावर तब्बल 72 % यादव होते. उरलेल्या पदांवर इतरांना सामावून घेतले होते. अखिलेश यादव यांच्या सरकारने उत्तर प्रदेश प्रादेशिक आर्म कॉन्स्टेबिलरीच्या 54 कंपन्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये दंगेखोरांना मोकळे रान मिळाले होते. त्यांच्या कारकिर्दीत 2 लाख 50 हजार पोलीस भरती पेंडिंग राहिली होती. त्या भरतीकडे अखिलेश यादव यांनी पाच वर्षांच्या काळात लक्ष दिले नव्हते. न्यायालयाला देखील त्यांच्या पोलीस भरतीच्या पारदर्शकतेबाबत शंका होती. त्यामुळे भरतीतली तूट सतत वाढत गेली. राज्यातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पोलीस लाईनच नव्हती. या सगळ्याचा फायदा भू माफिया आणि जिहादी दंगेखोरांनी उपटला. त्यांनी स्वतःची मोठमोठी नेटवर्क उभी केली. त्याच काळात समाजवादी पार्टी सगळीकडे आणि सगळ्या दृष्टीने बहरत गेली. पण राज्याची प्रतिमा ढासळत गेली.
पण 2017 नंतर हे सगळे चित्र टप्प्याटप्प्याने बदलले. त्यानंतरच्या आठ वर्षांच्या काळात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 2 लाख 16 हजार पोलीस भरती केली. उत्तर प्रदेश प्रादेशिक आर्म कॉन्स्टेबलरीच्या PAC 54 कंपन्या पुनरुज्जीवित केल्या. तीन महिला आर्म कॉन्स्टेबलरी PAC तयार केल्या. उत्तर प्रदेशातल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्वतंत्र सुरक्षा दल तयार केले. सगळ्या PAC जवानांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली. उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि तालुका पातळीपर्यंत 11 लाख ठिकाणी चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. 17 शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण केले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये सायबर सेल तयार केला. सायबर सेलचा रिस्पॉन्स टाईम 7.24 मिनिटांवर आणला. त्यामुळे पॉलिसी कारवाईत शीघ्रता आली. सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस लाईन मजबूत केली. गुंड, मवाली, भू माफिया, गँगस्टर, दंगेखोर यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना खुली सूट दिली आणि त्यांना कायद्याचे संरक्षण दिले. मुख्य म्हणजे जिहादी दंगेखोर, गँगस्टर आणि भू माफिया यांच्या अवैध मालमत्तांवर हजारो बुलडोझर चालवले. कुठल्याही बड्या दादाला किंवा आकाला किंवा त्या आकाला सोडले नाही. सगळ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणून बडगा दाखवला. भू माफियांकडून हजारो हेक्टर जमिनी सोडवून त्यावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हजारो घरे बांधली. ती लाभार्थ्यांना वाटली.
– बाकीच्या बुलडोझर बाबांना देखील प्रेरणा
या सगळ्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था सुधारली. उत्तर प्रदेशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदा व्हायला लागल्या. जिहादी बॉलीवूडला पर्याय ठरेल अशी चित्रनगरी उत्तर प्रदेशात उभी करायची तयारी झाली. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा बुलडोझर बाबा अशी बनली. अन्य राज्यांमध्ये जनतेची आपापल्या मुख्यमंत्र्यांकडून तशीच अपेक्षा निर्माण व्हायला लागली म्हणून योगी बाबाचा बुलडोझर चालवण्याबरोबरच देवाभाऊचा बुलडोझर चालायला लागला. मोहन बुलडोझर, पुष्कर बुलडोझर, नायब बुलडोझर, अशा वेगवेगळ्या बुलडोझर कंपन्या जोरदार चालायला लागल्या. पण या बुलडोझर कंपन्यांचे मूळ योगी बाबाच्या बुलडोझर कंपनीत होते. त्यामुळे दंगेखोरांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये चाप बसला. ही योगी बाबांच्या गेल्या आठ वर्षांची कहाणी आहे. त्यांच्या राजवटीची निवडणुकीपूर्वीची दोन वर्षे अजून बाकी आहेत.
Yogi Adityanath Government accomplishment eight years
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर “पवार संस्कारितांची” देखील तीच तगमग!!
- Nagpur : नागपुरातील सर्व भागातून हिंसाचाराच्या सहा दिवसांनी कर्फ्यू हटवला
- समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटनांकडून जास्तीत जास्त तुष्टीकरण; हेच भाजपसाठी राजकीय विस्ताराचे भरण पोषण!!
- Delimitation मीटिंग वरून तामिळनाडू मध्येच फूट; सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिल्यानंतर AIADMK चा वेगळा सूर!!