विशेष प्रतिनिधी
काठमांडू : योगसाधनेचा उगम भारतामध्ये नाही, तर नेपाळमध्ये झाला असल्याचा नवा साक्षात्कार आता नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी झाला आहे. या आधी त्यांनी सीतेचा जन्म नेपाळमध्येच झाल्याचे म्हटले होते. मात्र योगाबाबतच्या त्यांच्या ताज्या विधानाला नेपाळमधील तज्ञांनीही विरोध दर्शविला आहे.Yoga started in Nepal – Oli
योगादिनावेळी ओली म्हणाले की,‘‘ योगाचा उगम प्राचीन काळी उत्तराखंडमध्ये, विशेषत: नेपाळमध्ये झाला आणि त्यावेळी उत्तराखंड हा वर्तमान भारताचा भाग नव्हता. त्यावेळी स्वतंत्र देश म्हणून भारताचा जन्म देखील झाला नव्हता.’’
सुमारे १५ हजार वर्षांपूर्वी शंभुनाथ किंवा शिवाने योगसाधना सुरु केली. त्यानंतर महर्षी पतंजली यांनी योगाचा विकास केला. योग कोणत्याही एका धर्माशी किंवा पंथाशी संबंधित नाही. शिवाने पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या दिवशी, म्हणजे सध्याच्या कॅलेंडरप्रमाणे २१ जूनला, योगसाधना करण्यास सुरुवात केली.