विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दारू घोटाळ्यातले आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू कोर्टाने काल जामीन मंजूर केला, पण दिल्ली हायकोर्टाने आज त्या जामीनाला स्थगिती दिली. त्यामुळे जामिनानंतर आम आदमी पार्टीने केलेल्या उन्मानाला चाप बसला आहे. Yesterday’s bail of Kejriwal postponed today
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. ईडीने 48 तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध केला. आज दिल्ली हायकोर्टाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अवघ्या 24 तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
काल केजरीवालांना जामीन मंजूर केल्यानंतर आम आदमी पार्टीने दिल्लीत जल्लोष केला होता. जणू काही मोठ्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार असा आव आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आणला होता. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काय बोलणार??, केंद्र सरकारवर कोणत्या तोफा डागणार??, वगैरे चर्चा माध्यमातून सुरू झाली होती. परंतु, प्रत्यक्षात आज दिल्ली हायकोर्टाने त्यांच्या जामिनाला स्थगिती देऊन आम आदमी पार्टीच्या या उन्मादाला चाप लावला.
Yesterday’s bail of Kejriwal postponed today
महत्वाच्या बातम्या
- योग दिन 2024: भारतासह जगभरात योग दिवस साजरा करण्यास सुरुवात!
- सभासद शेतीच्या कामात व्यस्त, महाराष्ट्रात 8305 सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर!!
- पंतप्रधान मोदींनी श्रीनगरमध्ये केला योगाभ्यास; म्हणाले, आता जगाचे…
- योगाने जग व्यापले, अमेरिकेतही योग दिनाचा उत्साह; न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांनी केला योगा