प्रतिनिधी
मुंबई : होय, माझा देश सुंदरच आहे किंबहुना तो सर्व देशांमध्ये सर्वात महान आहे, पण फक्त तो राज्यघटनेच्या अनुयायांसाठीच…, हे ट्विट केले आहे आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा याने…!! Yes, my country is beautiful but only for the followers of the constitution
काहीच वेळापूर्वी क्रिकेटपटू इरफान पठाण याने एक ट्विट केले होते, माझा देश सुंदर आहे. महान देश बनवण्याची त्याची क्षमता आहे. पण…, असे म्हणून त्याने आपली कमेंट अर्धवट ठेवली होती…!!
इरफान पठाण याचे ट्विट असे अर्धवट न ठेवता क्रिकेटपटू अमित मिश्राने, देश सुंदरच आणि महानतम, पण तो राज्यघटनेच्या अनुयायांसाठी…!!, अशा शब्दांमध्ये इरफानला प्रत्युत्तर दिले आहे.
वास्तविक अमित मिश्राने इरफानचे नाव अथवा इरफानचे ट्विट यांचा संदर्भ नावानिशी घेतलेला नाही. मात्र आशिषने इरफानलाच चपखल उत्तर दिल्याचे सोशल मीडियात बोलले जात आहे. इरफान आणि अमित या दोघांची ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत.
यानिमित्ताने भारतीय क्रिकेटपटू आपल्या देशाविषयी नेमका कसा विचार करतात, हे समोर येताना दिसत आहे, अशा कमेंट अनेकांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केल्या आहेत.